संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची उकल करणारे ‘महाराष्ट्राचे शासन व राजकारण ‘ — हणमंत लोभाजी.
उदगीर(प्रतिनिधी)
मुंबई वगळता कर्नाटक सिमा भाग, गोवा, गुजरातमधला डांग, बस्तर, उंबरगाव हा बहुसंख्य मराठी भाग महाराष्ट्राला का मिळू शकला नाही? महाराष्ट्र् राज्याच्या निर्मिती पासून आतापर्यंत महाराष्ट्राचे राजकारण कसे बदलत गेले? याबरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची उकल करणारी साहित्यकृती म्हणजे ‘महाराष्ट्राचे शासन व राजकारण ‘ हि होय असे मत हणमंत लोभाजी यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गतच्या 290 व्या वाचक संवादात रविकिरण साने व निलिमा साने लिखित ‘महाराष्ट्राचे शासन व राजकारण ‘ या साहित्यकृतीवर हणमंत रामराव लोभाजी यांनी संवाद साधला. अंकुश हुंडेकर यांचे अध्यक्षतेखाली संवाद साधताना ते म्हणाले की, लेखकाने पुस्तकाच्या पुर्वपिठीके मध्ये संयुक्त महाराष्ट्र या शब्दाची व्याप्ती व त्या अनुशंगाने महाराष्ट्राने दिलेला लढा, त्याचे यश -अपयश याची मांडणी केली. महाराष्ट्र् राज्याच्या निर्मितीपासून आतापर्यंत महाराष्ट्राचे राजकारण कसे बदलत गेले? या बरोबरच केंद्रीय राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम झाला, राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाची मोडतोड आणि त्यांचे पुनर्रगठन, राजकिय प्रवाहाबरोबरोच दुर्लक्षित राहिलेल्या समाजघटकांनी विविध मार्गानी प्रस्थापित चौकट हलवण्याचा केलेला प्रयत्न, त्या सर्व आंदोलनाचा संदर्भासहित धावता आढावा संवादकाने घेतला.
या कार्यक्रमात वाचक आणि संवादक यांच्यातील चर्चेनंतर वाचकांना ग्रंथही भेट देण्यात आली. यानंतर अध्यक्षीय समारोपात हुंडेकर यांनी संवादाकाचे कौतुक केले. शासकीय दूध डेअरीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे संचालन प्रदीप ढगे यांनी केले तर आभार कुमारी राघवी नावंदर हिने मानले.