विधानसभा प्रमुखांना विश्वासात घेऊन मालकांनी मालकासारखे काम करावे – आ. रमेशआप्पा कराड

विधानसभा प्रमुखांना विश्वासात घेऊन मालकांनी मालकासारखे काम करावे - आ. रमेशआप्पा कराड

लातूर जिल्‍हा भाजपाच्‍या बैठकीत नूतन जिल्‍हाध्‍यक्ष दिलीपराव देशमुख यांचा सत्‍कार

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून जशी मला सर्वांनी साथ दिली तशीच साथ जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी नूतन जिल्‍हाध्‍यक्ष दिलीपराव देशमुख यांना द्यावी. विधानसभा प्रमुखांना विश्वासात घेऊन दिलीपराव मालकांनीही मालकासारखे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांनी एक दिलाने, एक ताकतीने काम करून पुन्हा एकदा लातूर जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला सिद्ध करू असे भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.

लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीची बैठक ३१ जुलै २०२३ सोमवार रोजी भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हा प्रभारी प्रा. किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील भक्ती शक्ती मंगल कार्यालयात संपन्न झाली या बैठकीत भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या बैठकीस लातूर ग्रामीण विधानसभा प्रमुख आ. रमेशआप्पा कराड, प्रदेश बुथ रचना संयोजक अरविंद पाटील निलंगेकर, उदगीर विधानसभा प्रमुख सुधाकर भालेराव, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, लोकसभा प्रचार प्रमुख राहुल केंद्रे, प्रा प्रेरणा होनराव, जयश्री पाटील, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार गोविंदअण्‍णा केंद्रे, प्रदेश भाजपाचे अविनाश कोळी, महिला आघाडीच्या भाग्यश्री क्षीरसागर, बापूराव राठोड, युवराज पाटील यांच्यासह अनेकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

आ. रमेशआप्पा कराड यांच्या काळात लातूर जिल्‍हयात अत्यंत चांगले काम झाले असून या पुढील काळातही त्याच पद्धतीने किंबहुना अधिक काम वाढले पाहिजे. मोदी जनसंपर्क अभियान, घर घर चलो अभियान, बुथ रचना यासह प्रदेशाने दिलेले सर्व कार्यक्रम जिल्हाभरात प्रभावीपणे राबवावे अशा सूचना करून संघटन मंत्री संजय कौडगे यावेळी बोलताना म्हणाले की, काम करणाऱ्यावर पार्टीचे लक्ष असते त्यातूनच दिलीपराव देशमुख यांची निवड झाली असून त्‍यांनी सर्वांना सोबत घेऊन सर्व कार्यकर्त्यावर प्रेम करून काम करावे असे बोलून दाखविले.

जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिलीपराव देशमुख यांचे अभिनंदन करून पक्षाने मालक म्हणून सिद्ध केले असल्याचे जिल्ह्याचे प्रभारी किरण पाटील यांनी बोलून दाखविले तर अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात नगरपालिका ते लोकसभा या सर्वच निवडणुका होणार असल्याने आपण सर्वांनी ताकतीने त्यांच्या पाठीशी राहुन पाठबळ देऊ असे सांगितले. यावेळी सुधाकर भालेराव, गोविंदअण्‍णा केंद्रे, गणेशदादा हाके यांच्यासह इतर मान्यवरांनी भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांचे अभिनंदन करून येणाऱ्या निवडणुकीतून लातूर जिल्हा भाजपाचा नंबर एकचा जिल्हा पुन्हा एकदा सिद्ध करूया असे बोलून दाखविले.

यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पर्यंत देण्यात आलेले सर्व कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यातून यशस्वीपणे पार पडले. आता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रदेश भाजपाने दिलीपराव देशमुख यांच्याकडे दिली असून आज पर्यंत ज्या पद्धतीने मला साथ दिली त्याप्रमाणे दिलीपराव देशमुख यांना सर्वांनी द्यावी असे आवाहन केले. येणारा काळ हा निवडणुकीचा असून विरोधी पक्षावर आक्रमण करताना आपण सर्वांनी एकत्रितपणे लढले पाहिजे यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील भाजपाची ताकद दिलीपराव देशमुख यांच्याबरोबर असेल असे सांगून आ कराड यांनी सर्वांना सामावून घेऊन जिल्हा कार्यकारणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल दिलीपराव देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

मी एक सामान्य कार्यकर्ता आहे भाजपाचा जिल्हाध्यक्ष होईल असे वाटत नव्हते मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि जिल्ह्यातील सर्व मान्यवर नेत्यांनी एक मुखाने माझ्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे जाहीर मनःपूर्वक आभार मानून भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख म्हणाले की रात्र दिवस मेहनत करून आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच निश्चितपणे जिल्ह्यात भाजपाचे प्रभावी काम करू अशी ग्वाही दिली.

बैठकीचे सूत्रसंचालन संजय दोरवे यांनी केले या बैठकीस जिल्हा कार्यकारणी मंडल अध्यक्ष प्रमुख लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author