विद्यार्थी हक्क कृती समितीची महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी जाहीर

विद्यार्थी हक्क कृती समितीची महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी जाहीर

मागच्या काही वर्षापासून विद्यार्थी हक्क कृती समिती ही महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्कासाठी व कला, क्रीडा,कौशल्य व सांस्कृतिक गोष्टींना व्यासपीठ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न महाविद्यालयीन स्तरापासून मंत्रालयापर्यंत या समितीच्या माध्यमातून उचलून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य झालेले आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करण्याचे कार्य समितीने केलेले आहे. विद्यार्थी हक्क कृती समितीच्या या अगोदरच्या जिल्हा कार्यकारिणी, विभागीय कार्यकारणी व प्रदेश कार्यकारणीचा कार्यकाळ हा 21 जुलै 2023 रोजी संपलेला आहे.

पुन्हा एकदा समितीने नव्या जिद्दीने आणि जोशाने महाराष्ट्रात विस्तार करण्याचा निर्धार केलेला आहे, हाच निर्धार मनाशी बाळगून समितीने 01 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व विभागातून विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी दिली आहे.

विद्यार्थी हक्क कृती समितीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी मध्ये प्रदेशाध्यक्ष पदी नांदेड येथील अझर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्ष पदी नागपूर येथील विश्वभूषण पाटील व सिंधुदुर्ग येथील मिहीर तांबे, प्रदेश सचिव पदी संतोष साखरे, प्रदेश सहसचिव पदी लातूर येथील ऋषिकेश पवार व जळगाव येथील भूपेश सोमवंशी, प्रदेश कार्याध्यक्ष पदी कोल्हापूर येथील पृथ्वीराज एकले, प्रदेश संपर्कप्रमुख पदी सांगली येथील प्रणव जाधव, प्रदेश संघटक पदी कोल्हापूर येथील अथर्व चौगुले प्रदेश सरचिटणीस पदी बुलढाणा येथील अजय जवंजाळ,प्रदेश आयटी प्रमुख पदी लातूर येथील निलेश डांगे,प्रदेश आरटीआय सल्लागार पदी पुणे येथील शेखर पवार व प्रदेश प्रसिद्धीप्रमुख पदी लातूर येथील माधव तरगुडे यांची निवड करण्यात आली आहे.

अवघ्या काही दिवसातच समितीच्या विभागीय कार्यकारणीचा, युवती कार्यकारणीचा व जिल्हा कार्यकारणीचा विस्तार केला जाणार आहे, अशी माहिती समितीचे मुख्य संपर्कप्रमुख रितेश रत्नगोले यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून पुढील काळात विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, कौशल्य आणि सांस्कृतिक गोष्टींना चालना देण्यासाठी कार्य करतील व विद्यार्थी वर्गाला अभिमान वाटेल असे कार्य या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हातून घडेल, असा विश्वास समितीचे संस्थापक अध्यक्ष चेतन अरविंद घोडके पाटील व संस्थापक सचिव रामराजे तानाजीराव काळे यांनी व्यक्त केला.

About The Author