माझी माती, माझा देश’ या अभियानात भाग घेण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नागरिकांना आवाहन

माझी माती, माझा देश’ या अभियानात भाग घेण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नागरिकांना आवाहन

लातूर ( एल .पी.उगीले) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त देशभरात अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यातून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन दिल्लीत पोहोचेल. देशाच्या विविध भागांतून रोपेही आणली जाणार आहेत. राष्ट्रीय युद्धस्मारकाजवळ कलशातील माती आणि झाडे टाकून ‘अमृत उद्यान’ बांधण्यात येईल. हे अमृत उद्यान ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ चे भव्य प्रतीक बनेल. यासाठी जिल्हा परिषदेकडून एक मोबाईल अँप तयार करण्यात आले आहे. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!