साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा भव्य दिव्य पुतळा उभारणार : ना.संजय बनसोडे

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा भव्य दिव्य पुतळा उभारणार : ना.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : आपल्या घराची श्रीमंती ही शिक्षणापासुनच आहे, त्यासाठी आपण महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावेत. त्यामुळे प्रत्येक समाजातील नागरिकांनी शिक्षणाला महत्व देवून आपल्या कुटुंबाचा विकास करावा. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी जे एकुण साहित्य लिहिले, त्यासाहित्यतून कामगार, कष्टकरी, शेतकरी यांच्या व्यथा मांडत होते. अण्णाभाऊ साठेंनी जे जगले, अनुभवले त्यालाच त्यांनी साहित्यामध्ये शब्दरुप दिले असुन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांना आपण वेळोवेळी स्मरावे अशी भावना समाजबांधवांची असल्याने आपल्या शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा भव्य दिव्य पुतळा उभारणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.ते उदगीर शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी माजी आ.गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, सभापती शिवाजीराव हुडे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, रामचंद्र तिरुके, काँगेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, समीर शेख, प्रा.रामकिशन सोनकांबळे, दिलीप गायकवाड, शिवाजीराव देवनाळे, पप्पु गायकवाड, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, सौ.उषा कांबळे, बन्सीलाल कांबळे, शिवाजीराव सुर्यवंशी, माजी नगरसेवक राजकुमार भालेराव, अनिल मुदाळे, सय्यद जानीमियाॅ, फय्याज शेख, संग्राम अंधारे, वसंत पाटील, बाबुराव अंबेगावे, साईनाथ चिमेगावे, मदन पाटील, बिभीषण मद्देवाड, शिवकर्णा अंधारे, अॅड विष्णु लांडगे, धिरज कसबे, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना.बनसोडेने स्पष्ट केले की,शहरात लवकरच महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य १५ फुटाचा पुतळा उभारणार आहे. त्यानंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा १५ फुटाचा पुतळा उभारणार असल्याचे सांगितले. सुत्रसंचलन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार अॅड.विष्णु लांडगे यांनी मानले.

यावेळी मदन तुळजापुरे, रवींद्र बेंद्रे, शिवाजी वाघमारे, जवाहरलाल कांबळे, कनवर सकट, नटवर सकट, रुपेंद्र चव्हाण, राम शिंदे, मुकेश भालेराव, विजयकुमार पाटील, अमोल निडवदे, बालाजी केंद्रे, मदन पाटील, मुकेश भालेराव, राजकुमार बिरादार, बालाजी परकड, अमोल अनकल्ले, संघशक्ती बलांडे, विलास शिंदे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author