लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊंची जयंती ऊत्साहात साजरी

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊंची जयंती ऊत्साहात साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी कलोपासक मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. प्रारंभी या दोन्ही महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार उपस्थित होते .तर प्रमुख अतिथीस्थानी मुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी , पर्यवेक्षक कृष्णा मारावार, लालासाहेब गूळभिले,माधव मठवाले,करूणा गायकवाड ,मिनाक्षी कस्तूरे मंचावर उपस्थित होते.

लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग लघूनाटिकेतून व पोवाड्यातून विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले. याप्रसंगी गायत्री तोगरेकर या विद्यार्थ्यांनीने लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्रातून इंग्रजांबद्दलचा असंतोष भारतीय जनतेच्या मनात पसरवला यांसारख्या प्रसंगातून लोकमान्य टिळकांचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांसमोर उभे केले.तसेच कार्यक्रमाच्या दुसऱ्या प्रमुख वक्त्या सहशिक्षिका करूणा गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विविध व्यक्तीरेखांचा परीचय करून दिला.

उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांचे साहित्य वाचन करून त्यांची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.तर अध्यक्षीय समारोपात बालाजी पडलवार यांनी टिळक व साठे यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग प्रभावीपणे सांगितले.सोनाक्षी गायकवाड या विद्यार्थिनीने लोकमान्य टिळक यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य घाळे व मुकुंद मिरगे , स्वागत परिचय प्रथमेश बोधनकर तर प्रास्ताविक निखिलेश पाटील यांनी केले. वैयक्तिक गीत शिल्पा सेलूकर यांनी गायले. आभार अथर्व चव्हान व स्मिता पाटील यांनी व्यक्त केले.कल्याण मंत्र सार्थक स्वामी यांनी गायले. लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित लघु नाटिका पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलोपासक मंडळप्रमुख गुरूदत्त महामुनी ,राजेश गौतम,कार्यक्रम प्रमुख प्रिती शेंडे ,सुरेखा शिंदे यांनी परीश्रम घेतले.

About The Author