लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त बालसभेचे आयोजन

लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त बालसभेचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभ्यासपूरक मंडळ प्रमुख माधव केंद्रे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले होते.या बालसभेसाठी अध्यक्ष म्हणून चि.राघव पद्माकर बोळे,तर प्रमुख पाहुणे म्हणून कु.आरोही कलप्पा रोट्टे व चि.सात्विक सचिन जाधव उपस्थित होते.व्यासपिठावरील बाल मान्यवर , शाळेचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.बालसभेतील सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे बाल प्रमुख पाहुणे कु.आरोही रोट्टे व चि.सात्विक जाधव यांनी अनुक्रमे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित खूप छान प्रकारे माहिती सांगितली. अध्यक्षीय समारोपपर भाषणात चि.राघव पद्माकर बोळे यांनी लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध दिलेल्या लढ्याबद्दल माहिती सांगितली.आपणही देशासाठी काहीतरी केले पाहिजे.असे मत व्यक्त केले. सुत्रसंचलन कु.ऐश्वर्या कुलकर्णी यांनी केले तर आभार कु.सान्वी नाईक हिने मानले.

About The Author