तरुणांचा मनसेमध्ये प्रवेशासाठी प्रचंड उत्साह
उदगीर (एल.पी.उगीले) : सामाजिक जाणीव जपत आपल्या न्याय व हक्क मागण्यासाठी लढा देणारी आणि सर्वसामान्य माणसाला सन्मान मिळवून देणारी संघटना म्हणून तरुण वर्ग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे आकर्षित होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून उदगीर मधील छ्त्रपती शिवाजी महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केला. हा पक्ष सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून लढणारा पक्ष असून समाजातील सर्व स्तरातील समस्या सोडवण्यासाठी तसेच विद्यार्थी चळवळीतून विद्यार्थी प्रश्नावर आवाज उठवत विद्याथ्याना न्याय मिळवून देण्यासाठी मनविसे सदैव अग्रेसर असते. सातत्याने प्रयत्नशील असते, तसेच महाराष्ट्राचे नवनिर्माण घडविण्यासाठी व विद्यार्थी दशेतुन चळवळीचे संस्कार देवुन भविष्यातील सक्षम नेते घडविण्यासाठी मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रोहीत बोईनवाड शहर सचिव यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणानी मनसे विद्यार्थी सेनेत प्रवेश केला.
अनिकेत कृष्णा घोगरे, प्रसाद ठोंबरे, प्रसाद धोनी, प्रशांत मोरे, शिवधन चिखले, सुरज कोयले, संग्राम मोरे, दत्ता मोरे, गणेश बिरादार, वैभव बिरादार, शुभम बिरादार, योगेश बापटले, गणेश बिरादार, अजिंक्य सूर्यवंशी या तरुणांनी प्रवेश केला. यावेळी मनसे शहराध्यक्ष संतोष भाऊ भोपळे, मनविसे शहराध्यक्ष दिनेश पवार, तालुका उपाध्यक्ष योगेश पवार,शहर उपाध्यक्ष अविनाश जाधव , परमेश्वर भोसले,धोडींराम हिंगमिरे,दीपक करक्याळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.