ग्रामीण रुग्णालयातील प्रसुती झालेल्या व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांचा साडी चोळी देऊन गौरव.

ग्रामीण रुग्णालयातील प्रसुती झालेल्या व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांचा साडी चोळी देऊन गौरव.

अहमदपूर ( गोविंद काळे )
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकरावजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रसुती झालेल्या व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना साडी चोळी,व बेबी किट देऊन गौरवण्यात येऊन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
शहरातील रायगड मित्र परिवाराच्या माध्यमातून गणेश हालसे यांच्या पुढाकाराने वाढदिवसाच्या निमित्य आज ग्रामीण रुग्णालय अहमद्पुर येथे प्रसुती झालेल्या मातांना तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या भगिनी यांना साडी चोळी व नवजात शिशु यांना बेबी किट चे वाटप व रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम व तसेच ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका भगिनी ,आरोग्य सेवक ,सफाई कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी .डॉ .सुरजमल सिंहाते हे होते .या कार्यक्रमास विशेष उपस्थिती डॉ .मधसुदन चेरेकर , भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांची उपस्थिती होती .
या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार सुरेश डबीर , भाजपा जेष्ठ नेते चंद्रशेखर डांगे,अहमद्पुर केमिस्ट ड्रगिस्ट असोशियसन तालुका अध्यक्ष संगमेश्वर निला ,विविध कार्यकारी सोसायटी चे सर्वश्री संचालक यतिराज केंद्रे ,माजी व्हॉइस चेअरमन पांडुरंग पाटील , संचालक विजयकुमार पाटील , राजकुमार रेड्डी , बालाजी बोबडे , सोमनाथ पुणे , तुकाराम सांगवीकर , रायगड मित्र परिवाराचे मार्गदर्शक दयानंद घाटोळ राजु कंधारकर,मकरंद जोशी , शरद मैड ,मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष भीमराव पाटील , विष्णु पौळ ,रायगड मित्र परिवाराचे सदस्य राजू पवार , गोविंद हिवरे , विनोद भुतडा , अनिकेत काशीकर , गणेश हालसे , अतुल सूर्यवंशी सोरेकर , प्रफुल कल्याणी , कपील मुरुडकर ,सुदर्शन हालसे ,वैभव शेटकर , सुनील हालसे , वैभव बल्लोरे , दिपक हालसे , शुभम बोधनकर.हे उपस्थित होते .

About The Author

error: Content is protected !!