ग्रामीण भागातील शाळेतूनही विद्यार्थी उत्तुंग भरारी घेवू शकतात – गणेश हाके
अहमदपूर( गोविंद काळे ) आजच्या काळात पालक आपल्या पाल्यांना उत्तम शिक्षण मिळावे तसेच तो स्पर्धा परीक्षेत भरारी घ्यावी म्हणून मोठमोठ्या शहरांमध्ये शिक्षणासाठी पाठवतात. पण सांगवी येथील पु अहिल्यादेवी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या निकालाने स्पष्ट केले की, ग्रामीण भागातील शाळेतूनही नीट सारख्या परीक्षेत असो किंवा सेट नेट ची परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा असो विद्यार्थी या परीक्षेत उत्तुंग भरारी घेवू शकतात असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेश हाके यांनी केले.
ते तालुक्यातील सांगवी सु येथील पु अहिल्यादेवी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बालाघाट शैक्षणिक संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता अकरावीच्या नुतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, नीटच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सेट नेट मध्ये यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजपाचे नुतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस तथा संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई हाके, भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ॲड हेमंत गुट्टे, बालाघाट तंत्रनिकेतनचे प्राचार्य नागरगोजे, सय्यद आजम , बालाघाट आय टी आय चे प्राचार्य आरदवाड आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना गणेश हाके म्हणाले की, संस्थेने ग्रामीण भागात शाळा काढण्याचे जे उद्दिष्टे समोर ठेवली होती त्या उद्दिष्टांची पुर्तता आज सांगवीच्या पु अहिल्यादेवी या शाळेत होताना पाहून आनंद होतो आहे. निकालाची परंपरा अशीच कायम असावी अशी इच्छा व्यक्त केली.. यानंतर भाजपाचे नुतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख म्हणाले की, खरं शिक्षण ग्रामीण भागातच असते कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्तेबरोबर संस्कारी आणि सृजनशील होतात.याप्रसंगी बारावी विज्ञान मध्ये सर्वप्रथम आल्याबद्दल सय्यद सादिया महेताब तर द्वितीय ,श्रीरामे नागेश विश्वनाथ, तृतीय हाके भक्ती माणिक व पाटील नंदिनी परशुराम यांचा आणि कला शाखेतून सर्वप्रथम आल्याबद्दल हनवते ऋतुजा मुनेश्वर, द्वितीय चेपूरे साक्षी रमेश, तृतीय कारनाळे अंजली राम यांचा गौरव करण्यात आला.तसेच नीट २०२३ मधील गुणवंत विद्यार्थी सय्यद सादिया महेताब हिने पहिल्या प्रयत्नात ५६५ गुण व हाके भक्ती माणिक हिनेपण पहिल्या प्रयत्नात ५४१ गुण प्राप्त केल्याबद्दल यांचे गौरव करण्यात आले तर शाळेचे विद्यार्थी चव्हाण किरण लिंबाजी आणि चव्हाण गणेश गुलाब यांनी सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल या सर्व गुणवंतांचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांकडून इयत्ता अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या रेखाताई हाके यांनी केले तर सूत्रसंचालन दैवशाला शिंदे आणि रमेश चेपूरे यांनी केले आणि आभार संतोष मुळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अच्युत सुरनर, संभाजी दुर्गे, कौशल्या देवकते,चिंतन गिरी, गणेश जाधव, तेजस्विनी फाजगे, शिवाजी सुरनर, संदेश हाके,हिदायत शेख,संजय कजेवाड, विवेकानंद सुरनर, विश्वंभर सुरनर आदींनी परिश्रम घेतले.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.