सैनिक हे भारतीयांसाठी धैर्य, सामर्थ्य,आणि स्वाभिमान.!-उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर

सैनिक हे भारतीयांसाठी धैर्य, सामर्थ्य,आणि स्वाभिमान.!-उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर

अहमदपूर ( गोविंद काळे )
भारतीय सैन्य हे आपल्या देशाच्या धैर्य, सामर्थ्य आणि शिस्तीचे सर्वोत्तम उदाहरण असून आपल्या सर्व भारतीय जवानांचा प्रत्येक भारतीयांना सार्थ अभिमान असून देशासाठी युद्धात शहीद झालेल्या प्रत्येक जवानांची भारतीयांनी कृतज्ञता ठेवण्याचे आवाहन पोलीस उपाधीक्षक मनीष कल्याणकर यांनी केले.

अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सम्राट मित्र मंडळाच्या वतीने कारगिल विजय दिन आणी विर जवानांना अभिवादन कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी पोलीस उपअधीक्षक मनीष कल्याणकर बोलत होते.

यावेळी पोलीस निरीक्षक सुधाकर देडे,मेजर मधुसूदन चेरेकर, सांबतात्या महाजन, लक्ष्मणराव अलगूले,बबलूखान पठाण,जुगलकिशोर शर्मा,देवेंद्र देवणीकर, एन.डी.राठोड,आर.जी.कांबळे,मनोहर गायकवाड,संपन्न कूलकर्णी, अँड.अमितरेड्डी, गोविंदराव गिरी, कमलाकर पाटील, मेघराज गायकवाड, शिवराज पाटील, कॅप्टन गणपत दोडे पाटील, कॅप्टन माधव शिरसाठ, सुभेदार विठ्ठल शिंदे, नाईक सुभेदार पी व्ही, केंद्रे,नाईक सुभेदार एम आर कांबळे, नाईक शिवाजी इप्पर, हवालदार रमेश मुंडे, हवालदार जी एम भोसले, नायक विष्णू जायभाये, हवालदार मद्देवाड, हवालदार बी एन.कराड, हवालदार शिवनाथ चाटे, गोविंद दहिफळे,हवालदार पिराजी तुडमे, हवालदार शिवाजी गुट्टे,शिपाई दिलीप गुट्टे आदी सैनिकांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना मनीष कल्याणकर म्हणाले की,भारतीय सैनिकांचा आम्हाला सार्थ अभिमान असून सैनिकांचे कार्य अतुलणीय आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विर सैनिकांमूळे कारगिल युद्ध आपण जिंकू शकलो.मध्ये अंगावर भारतीय जवानाने केले आहे.जे जवान शहीद झालेत त्यांच्या प्रति आम्हाला सार्थ अभिमान असून सैनिकांच्या कुटुंबाप्रती आम्ही सदैव त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू असेही ते शेवटी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक नेते तथा संयोजक डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी करून कारगिल युध्दातील विजय हा ऐतिहासिक स्वरूपाचा असून तो नव्या पिढी पर्यंत पोचविणे नितांत गरजेचे आहे.त्याच बरोबर सिमेवर सैनिक फौजी आहेत म्हणुन आपण गूण्या गोविंदाने रहात असुन सैनिकांच्या प्रती संवेदना प्रकट करायला हवी त्या साठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगीतले.

यावेळी कॅप्टन गणपत दोडे पाटील म्हणाले की, कारगिल दिवस हा विजयाचा आणि दुःखाचा दिवस आहे जे जवान या युद्धात शहीद झाले त्यांच्या कुटुंबासाठी दुःखाचा दिवस आहे. त्यांच्या पाठीमागे समाज उभा राहिला पाहिजे.
तर पोलीस निरीक्षक सुधाकर देडे म्हणाले की,आपली सर्व दुःखी बाजूला सारून देशाचे रक्षण करणारा जवान हा भारतीयांसाठी स्वाभिमानाची बाब आहे.घरात दुःखाचा डोंगर कोसळला तरी सैनिक सीमेवरून पाठीमागे फिरत नाही तिरंगा फडकविन किंवा तिरंग्यामध्ये लपेटून घरी येईल हेच त्यांना माहिती असतं असे ते म्हणाले.
मेजर मधुसूदन चेरेकर म्हणाले की,भारतीय जवानांना काळ वेळ काहीच नसते केव्हाही कुठेही सज्ज व्हावे लागते देशासाठी लढताना फक्त तिरंगा एवढाच स्वाभिमान उराशी त्यांना बाळगावा लागतो.तर फौजी शिवनाथ चाटे म्हणाले की,कारगिल हे विश्वातील लढाईचे ते उंच ठिकाण असून जिथे ऑक्सिजन नसतानाही जवान लढले ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

कार्यक्रमाची सूरूवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर मेणबत्ती पेटवून शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.तसेच शहरातील पन्नास ते साठ माजी सैनिक फौजी बांधवाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला.वंदे मातरम या राष्ट्रगानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या वेळेस गोविंद गिरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी तर आभार प्रशांत जाभाडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार अजय भालेराव, गणेशराव मूंडे,सचिन बानाटे,तबरेज सय्यद,मोहम्मद पठाण,प्रकाश लांडगे आदींसह सम्राट मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पूढाकार घेतला.

About The Author