शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले यांचा प्रयत्न ;अहमदपूर शहरासाठी १ कोटीचा विकास निधी मंजूर
अहमदपूर (गोविंद काळे) : शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले यांच्या प्रयत्नातुन अहमदपूर शहरातील काही प्रभागातील विविध रस्ते व नाली बांधकामासाठी विशेष रस्ता अनुदान म्हणून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शहराच्या विकासात भर पडणार असून नागरिकांच्या अडचणी सुटणार आहेत.
शिवसेना सचिव संजय मोरे व शिवसेना संपर्कप्रमुख अँड श्रीनिवास क्षीरसागर यांच्या सहकार्यामुळेच हा निधी मंजूर झाला आहे. मंजूर करण्यात आलेल्या या निधीमुळे शहराच्या विकासात निश्चीतच भर पडणार असल्यामुळे शहरातील नागरिकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. या मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून शहरातील विविध विकास कामे होणार आहेत. यात शिवपार्वती नगर केंद्रे यांचे घर ते सूर्यकांत गुट्टे ते राठोड यांचे घर सिमेंट रस्ता व नाली करणे १० लाख रुपये, थोडगा रोड ते चेबाळे यांचे घर ते कुकाले यांचे घर सिमेंट रस्ता व नाली करणे १० लाख रुपये, शिव पार्वती नगर अर्जुन गुट्टे यांचे घर ते बालाजी महाजन यांचे घर सिमेंट रस्ता व नाली करणे १० लाख रूपये, शिवपार्वती नगर लोकरे यांचे घर ते सय्यद यासीर बाबा यांचे घर ते केंद्रे यांचे घर सिमेंट रस्ता व नाली करणे १० लाख रुपये, शिवपार्वती नगर विठ्ठल झुबरे यांचे घर ते दराडे व गुट्टे यांचे घर सिमेंट रस्ता व नाली करणे १० लाख रूपये, पोचम्मा नगर विविध ठिकाणी नाली बांधकाम करणे १० लाख रुपये, पोचम्मानगर संजय रेड्डी यांचे घर ते ग्लोबल स्कूल (शंकर अबरखंडे) पर्यंत सिमेंट रस्ता करणे १० लाख रूपये, सरस्वती कॉलनी, कांडनगिरे यांचे घर ते सचिन पडीले यांचे घर दोन्ही साईड नाली बांधकाम करणे १० लाख रुपये, शिवपार्वती नगर थोडगा रोड ते आगलावे विलास यांचे घर सिमेंट हस्ता करणे १० लाख रुपये, रुकमे नगर काशिनाथ डांगे यांचे घर ते गंगावारे यांचे घर सिमेंट रस्ता करणे, रुकमे नगर उगिले यांचे घर ते परमेश्वर पाटील यांचे घर सिमेंट रस्ता करणे १० लाख रुपये असे विविध ठिकाणची कामे मंजूर करून आणल्याबद्दल अहमदपूर मधील नागरिकांनी शिवसेना शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले यांचे आभार मानले आहेत.