वर्षा माळी यांचे पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षेत यश

वर्षा माळी यांचे पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षेत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालया माजी आदर्श विद्यार्थिनी तथा यशवंत विद्यालय अहमदपूरची संस्कृत विषयाची विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती वर्षा वसंतराव लगडे माळी यांनी नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मराठी विषयातील पीएच.डी .कोर्स वर्क परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी श्रीमती वर्षा लगडे माळी यांनी जीवनात आलेल्या संकटावर मात करून उच्च शिक्षण घेण्याचा मानस ठेवून आपला जीवन प्रवास सुरू ठेवला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून मराठी विषयांमध्ये पीएच.डी. करण्यासाठी आवश्यक असलेल्या पीएच.डी. पूर्व कोर्सवर्क परीक्षेत ७४ टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. यासाठी त्यांना महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्यासह मराठी विभागातील प्रोफेसर ह. भ. प.डॉ. अनिल मुंढे, डॉ.मारोती कसाब यांचे मार्गदर्शन लाभले.
याबद्दल श्रीमती वर्षा लगडे माळी यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author