शिक्षक भरती साठी येणार्या काळात प्रयत्न करणार शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांचे प्रतिपादन
अहमदपूर ( गोविंद काळे ) : आत्तापर्यतच्या रिक्त झाालेल्या शिक्षकांच्या जागा व येणार्या काळात रिक्त होणार्या जागा या शिक्षक भरतीसाठी विशेष प्रयत्न करणाार असल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांनी केले.
ते येथील संस्कृती फंक्शन हॉल येथे आयोजित उपप्राचार्य प्रा. गिरीधर सोपानराव घोरबांड व निदेशक शिवानंद काशिनाथ भेटे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टागोर शिक्षण समितीचे सचिव, शिक्षण महर्षि दलित मित्र डी. बी. लोहारे गुरुजी हे होत तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र एच. पैके, टागोर शिक्षण समिती सहसचिव डॉ. सौ. सुनिताताई चवळे, जयभवानी शिक्षक प्रसारक मंडळ, सोनवळा येथील अध्यक्ष सुधाकरभाऊ घोरबांड , डॉ. रंणजित जाधव, मनोहर नारायण पुंड, अॅड. भगवानराव सांगवे, प्राचार्य गजानन शिंदे, उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेद्देवाड, निर्मला पंचगले माधवराव घोरबांड , मातोश्री शांताबाई काशिनाथ भेटे, मातोश्री चंद्रभागाबाई घोरबांड, आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. विक्रजी काळे म्हणाले की, येणार्या काळात असंख्य शिक्षकांच्या जागा रिक्त होणार असुन बर्याच ठिकाणच्या शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षक भरती होणे गरजेचे आहे. तरुणांना नौकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच शिक्षकांच्या हक्क व रक्षणासाठी मी सदैव तत्पर असुन येणार्या काळात रिक्त असलेल्या जागेवर भरती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तांत्रिक अभ्यासक्रम बंद करण्याचा सरकारचा विचार होता मात्र त्यावेळी आम्ही सांगितले की एखादा नविन अभ्यासक्रम सुरु करने शोभेल परंतु चालु अभ्यासक्रम बंद करणे हे शोभणार नाही. तसेच शिक्षकांचे मानधन प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुक्रमे पंधरा हजार, अठरा हजार आणि विस हजार अश्या प्रकारे वाढविण्यासाठी प्रयत्न करुन वाढवुन घेतले. शिक्षकांनी पहिले प्राधान्य विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. आणि उपप्राचार्य घोरबांड आणि भेटे सर यांनी आपल्या जीवनात विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना उपप्राचार्य घोरबांड म्हणाले की, आमच्या विविध प्रश्नासाठी शिक्षक आ. विक्रमजी काळे हे सदैव उपस्थित राहीलेले आहेत. केवळ आमच्यावर असलेल्या प्रेमापोटी ते या कार्यक्रमासाठी आज मुंबई येथुन आले आहेत. शिक्षकांच्या कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहुन शिक्षकांच्या प्रश्नाबाबतीत, त्यांच्या अडचणीबाबत सदैव तत्पर असतात. टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षि डी. बी. लोहारे गुरुजी यांनी मला नौकरीची संधी उपलब्ध करुन दिली त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो असेही ते म्हणाले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना भेटे सर म्हणाले की, तांत्रिक शिक्षणाला जीवदान देवून माझ्यासारख्या असंख्य शिक्षकांना तारण्याचे कार्य आ. विक्रमजी काळे यांनी केले आहे. तसेच यशवंत तांत्रिक विद्यालयाची स्थापना करुन आधुनिक शिक्षक देण्याची दूरदृष्टि बाळगणारे शिक्षण महर्षि डी. बी. लोहारे गुरुजी यांचेही ऋण मी कधीच विसरु शकत नाही. असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. सौ. सुनिताताई चवळे, प्रा. अनिल चवळे, प्रा. रविशंकर इरफ ळे, आदिंनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सय्यद एम. यू. यांनी केले तर कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सुत्रसंचलन सहशिक्षक कपिल बिरादार तर आभार राम तत्तापुरे यांनी केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक आर. व्ही. पाटील, प्रा. पुणे आर. जी., प्रा. मलशेट्टे श्रीशैल्य, प्रा. राहुल देशमुख, प्रा. अनमोल पटवारी, प्रा. शिवशंकर पाटील, प्रा. दिनेश तोंडारे, प्रा. विश्वंभर स्वामी, प्रा.ननीर सतिश, प्रा.क्षिरसागर नंदकिशोर, प्रा. घटकार एस. टी., प्रा. येलमटे सुरेंद्र, प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर, प्रा.चिवडे निळंकठ, गौरव चवंडा, बालाजी सोनटक्के, युवराज पाटील, सहशिक्षक महादेव खळुरे, डॉ.शरद करकनाळे, मोहनमामा कांबळे, योगेश बिरादार आदिंनी परिश्रम घेतले.