जनसामान्यांच्या जीवनाचे वास्तव अण्णाभाऊंनी साहित्यातून चित्रित केले – डॉ. मारोती कसाब

जनसामान्यांच्या जीवनाचे वास्तव अण्णाभाऊंनी साहित्यातून चित्रित केले - डॉ. मारोती कसाब

अहमदपूर (गोविंद काळे) : अण्णाभाऊ साठे हे जसे जगले तसंच त्यांनी साहित्यातून मांडण्या चे कार्य केले त्यांच्या साहित्यातील पात्र हे दीन – दलित, पीडित, कष्टकरी समाजातील लोकांच वास्तव जगासमोर आणण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी आणि आपल्या वाग्ङ्मयातून केले आहे, असे स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयातील मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा कवी डॉ. मारोती कसाब यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील मराठी भाषा तथा साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक तथा ललित लेखक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते, तर ; मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक तथा कवी डॉ.मारोती कसाब यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ मारोती कसाब म्हणाले की लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांनीही महाराष्ट्र एकीकरणासाठी महत्वाची योगदान देऊन आपल्या साहित्याच्या माध्यमातून जन माणसाला न्याय मिळवून देण्याचे कार्यही त्यांनी केले असेही ते म्हणाले. तसेच याकार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात पत्रकारितेच्या माध्यमातून तसेच जनसामान्यांचे नेतृत्व करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, त्याच पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांनीही संयुक्त महाराष्ट्र एकीकरणाची चळवळ गतिमान करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर ; आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी डॉ. सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील, चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author