यशवंत विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी.
अहमदपूर ( गोविंद काळे) येथील यशवंत विद्यालयात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.
प्रारंभी प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मराठी विभाग प्रमुख राम तत्तापुरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेद्येवाढ, विजय चव्हाण, मधुबाला आंधळे , महादेव खळुरे, बालाजी माळी, मारुती पवार, शरद करकनाळे, मुकरम सय्यद यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी आभार शिवाजी सूर्यवंशी यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.