साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे १०३ व्या जयंती लासोना येथे संपन्न
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचा विचार प्रत्येकाच्या घरा घरात पोहचला पाहिजे – अंकुशराव माने
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी तालुक्यातील लासोना येथे लोकशाहीर साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांची १०३ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच धनराज मठपती, व उपसरपंच मा अंकुश माने,यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी गावतील नागरिक ग्राम पंचायत सदस्य कोमल माने, माजी तंटामूक्ती अध्यक्ष तुकाराम माने, माजी ग्राम पंचायत सदस्य सत्यवान माने ,यावेळी गावचे उपसरपंच मा अंकुश माने यानी आण्णासाठे यांच्या कार्यकाळ खडतर जीवन व साहित्य लोकापर्यत पोहचवण्याचे काम केले आहे आजही फकिरा कांदबरी महाराष्ट्राला पहिला बहुमान साहित्याचा माध्यमातून मिळवले आहे अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत, पवाडे, लोकनाट्य हे कला जिवंत ठेवण्याचे काम फक्त आण्णाभाऊ साठे यांनीच करु शकले आहे, म्हणून प्रत्येकाच्या घरा घरात अण्णाभाऊचा विचार गेला पाहिजे,असे सखोल मार्गदर्शन केले व सुत्रसंचलन मा सत्यवान माने यांनी केले ,आभार सौ रेखा गायकवाड आशा सुपरवायझर यांनी मानले,