सरस्वती विद्यालयात सेवानिवृत्त गिरिधर जाधव यांचा सत्कार

सरस्वती विद्यालयात सेवानिवृत्त गिरिधर जाधव यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : सरस्वती विद्यालयातील मुख्य लिपिक गिरिधर हरिशचंद्र जाधव हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा विद्यालयाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
आमचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव ॲड.एल.ई.भागवत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष बी.के.सूर्यवंशी,नामदेवराव सोनवणे,माजी वेतन अधीक्षक संजय क्षीरसागर, शालेय समितीचे अध्यक्ष सी.के.साळुंके उपस्थित होते.
या प्रसंगी बालविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बी.एस.नाडे, कोषाध्यक्ष डॉ.आर.एन.लटुरिया, संचालक एस.एस.चपटे,एस.जी.पाटील, एस.व्ही. पाटील, डी.बी.माने,डी.सी.साळुंके उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक के.एच.शेळके यांनी केले.
यावेळी जाधव म्हणाले संस्थेच्या उभारणीपासून आजपर्यंतच्या यशाचे साक्षीदार ते उभारणीतील महत्वाची पायरी अशा शब्दात कार्याची भरभरून कौतुक केले.या प्रसंगी अनेक शिक्षक व विद्यार्थीनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी उपमुख्याध्यापक डी.आर.कुलकर्णी, पर्यवेक्षक गवळी एच.एस.माने पी.बी. मानकोसकर एस.एन. राठोड एच .आर.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील पालक, सरांचे नातेवाईक व नागरिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!