आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत मुरुड येथील अनेकांचा भाजपात प्रवेश
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील मौजे मुरुड येथील असंख्य तरुणांनी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुकीत जिद्दीने जोमाने काम करून भाजपाला मताधिक्य मिळवण्यासाठी मेहनत घेण्याची त्यांनी ग्वाही दिली.
लातूर ग्रामीण मतदार संघात विशेषता मुरुड शहरात भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून होत असलेली विविध विकास कामे पाहता रविवारी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात मुरुड येथील अनेक तरुणांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, लातूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष वैभव सापसोड, प्रदेश भाजपाचे सदस्य सतीश आंबेकर, भागवत सोट यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भाजपा नेते आ रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुरुड येथील अर्जुन मगर, गणेश शिंदे, महेश ठाकूर, विशाल पवार, सौदागर अडसुळे, रवी इटकर, बंडू कांबळे, रोहन पेटे, तात्या ईटकर, मनोज धोत्रे, मारुती इटकर, गोविंद ईटकर, आकाश ईटकर, सचिन कसबे, बापू इटकर, दत्ता चव्हाण, बबन ईटकर, दिनेश ईटकर, बबलू इटकर, नवनाथ इटकर, आनंद टिळक, संजू शिंदे, मनोज मंजूळकर, दशरथ झालकीकर, जनक लोमटे, राजेंद्र झानकीकर, गणेश जाडकर, सिद्धेश्वर पौळ, गणेश मंडले यांच्यासह अनेकांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांनी सर्वांचे भाजपा पक्षात स्वागत करून सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक मिळेल असा दिलासा देवून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकास कामाची माहिती दिली. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला मताधिक्य कशा पद्धतीने मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. नव्याने भाजपात प्रवेश केलेल्या सर्वांनी यापुढे फक्त भाजपाची ताकद वाढविण्यासाठी काम करू आणि पक्षाला प्रत्येक निवडणुकीत यश मिळण्यासाठी मेहनत घेऊ अशी ग्वाही दिली.