राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी मंडळाचा वार्षिक पदग्रहण सोहळा उत्साहात
लातूर (प्रतिनिधी) : येथील राजा नारायणलाल लाहोटी स्कूलमध्ये सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी मंडळाचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजा नारायणलाल लाहोटी स्कुलचे चेअरमन आनंद लाहोटी होते तर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य कर्नल श्रीनिवासुल होते. मान्यवरांच्या हस्ते श्री पुरणमलजी लाहोटी व राजा नारायणलाल लाहोटी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
याप्रसंगी विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी (स्कूल कॅप्टन) जीत रांजणकर वर्ग १० वी , सहप्रतिनिधी – गार्गी सूर्यवंशी वर्ग ९ वी
सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी – आर्या इटकर वर्ग १० वी व क्रीडा प्रतिनिधी म्हणून प्रद्युम्न देशपांडे वर्ग १० वी या निवड झालेल्या तसेच विद्यालयातील चार हाऊसचे कॅप्टन , व्हाईस कॅप्टन या सर्व विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. शैक्षणिक वर्षातील सर्व वर्गाचे वर्गप्रनिनिधींचीही निवड यावेळी घोषित करण्यात आली. ” नेतृत्व गुण विकसित करून गुणवत्तापूर्ण विकासात पदग्रहण सोहळा हा महत्त्वाचा शालेय उपक्रम आहे. विध्यार्थ्यांची निवड ही शैक्षणिक गुणवत्ता , विविध उपक्रमांतील उस्फूर्त सहभाग तसेच आदर्श नेतृत्व कसे असावे ? हयाच निकषांवर विध्यार्थ्याची निवड केली गेली आहे . सर्व प्रतिनिधींनी कुशलतेने , शिस्तबध्द राहून जबाबदारी पार पाडावी आणि आदर्श निर्माण करावा .” असे मार्गदर्शन अध्यक्षीय समारोपात विद्यालयाचे प्राचार्य कर्नल श्रीनिवासुलू यांनी विद्यार्थ्यांना केले.
जीत रांजणकर याने ,”विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी खूप शिस्तबध्द , नियमबध्द राहीन आणि माझ्यासाठी ही सुवर्णसंधी आहे .” असे आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण शिवनगीकर, जयश्री पाटील, अरुण शेळवी सॅम्युअल, मनीषा मगर, रेश्मा काळे, डॉ सतीश जाधव, तुकाराम डिगोळे, देवयानी देशपांडे, विनोद चव्हाण, सुनील मुनाळे, शैलेंद्र डावळे, सुनिता झुंजे, प्रियंका गडदे आदींनी परिश्रम घेतले.