संगीतमय शिवरुद्राच्या मंत्रोच्चारात शिव महापुजनास शिवभक्तांचा उत्सफुर्त सहभाग
उदगीर(एल.पी.उगीले) अधिक श्रावणमास निमित्य ष.ब्र.108 शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूर यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित संगितमय शिवरुद्र मंत्रौच्चारात शिव महापुजनास भक्त उत्सफुर्त सहभाग घेत आहेत.
उदगीर शहरालगत असलेल्या मलकापुर येथील ललित भवन मंगल कार्यालयात ष.ब्र.१०८ शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांच्या दिव्य सानिध्यात अधिक श्रावणमास निमित्य शिव महापुजन सोहळ्यास २आॅगस्ट पासुन प्रारंभ झाला.दररोज सकाळी ९ वाजता महाराजांच्या उपस्थित शिव महापुजनास प्रारंभ होतो, या शिव पुजनास दांपत्य व महिला भक्त शिव लिंगाची पुजा बेल फुल पंचामृत आदी पुजेचे साहित्यास सहभागी होतात. .व्यासपीठावर ष.ब्र.शिवानंद शिवाचार्य महाराज शिव रुद्र मंत्रोच्चार सह शिव पुजन करतात. तर समोर बसलेले शिवभक्त त्याप्रमाणे शिव पुजन करतात. यावेळी संगितमय रुद्र पठण ओंकारेश्वर महिला भजनी मंडळ,शिव शक्ती महा भजनी मंडळाचे मंजू कप्ते,सरुबाई हलबर्गे,सुनिता स्वामी,सुशिला स्वामी यांनी रुद्र पठणात सहभाग घेतला, तर संगीत रुद्र संघ तमलूर (तेलंगणा) सहभाग घेत शिव रुद्र अभिषेक नंतर आरती ,गुरुमाऊलीचे पाद्य पुजन व आशिर्वचनाने कार्यक्रमाची सांगता होते. या सामुहिक शिव महापुजनात दररोज तीनशे महिला पुरुष शिवभक्त सहभागी होत आहेत .शिवपुजनासाठी समितीच्या वतीने बेलपत्री ची सोय करण्यात आली आहे. शिव महापुजन साठी,श्रीमती जयदेवी पोस्ते, सुनिता कड्डे, पार्वती स्वामी, विजयालक्ष्मी स्वामी , शालूतताई सोनटक्के,वनमाला कप्ते,महादेवी बिरादार,आरती धनशेट्टे,ईश्वरी कवडगावे, जगदेवी स्वामी,शितल बिरादार आदी महिला परिश्रम घेत आहेत