“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त उदगीर नगरपरिषद द्वारे विविध कार्यक्रम संपन्न”
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर नगरपरिषदे द्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा समारोप निमित्त माझी माती माझा देश उपक्रमांतर्गत “मिट्टी को नमन, वीरो को वंदन” करणे कामी उदगीर शहरातील विविध शालेय विद्यार्थी आणि उदगीर नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांची रॅली काढण्यात आली होती. सदर रॅलीस नगरपरिषद कार्यालय समोर मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅली नगरपरीषद कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यामार्गे हुतात्मा स्मारक उद्यान येथे पोहचली.
हुतात्मा स्मारक येथे सर्व प्रथम मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या शुभहस्ते त्याठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. त्या नंतर सामुहिक राष्ट्रगीत आणि राज्यगीत म्हण्यात आले.
“मातृभूमीचे स्वातंत्र्य आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांना विनम्र अभिवादन” करण्याच्या हेतूने शहरातील हुतात्मा स्मारक येथे पंतप्रधान महोदयांचा संदेश असलेला शिलाफलक त्यावर स्थानिक शहीद वीरजवान उद्धव गोविंद शिंदे, वैजिनाथ सोनाजी काळे, कृष्णकांत चंद्रकांत धाराशिवकर यांची नावे असलेला शिलाफलकाचे अनावरण शहीद वीरजवान यांच्या अर्धांगिनी श्रीमती चंद्रकलाताई उद्धव शिंदे व श्रीमती निर्मलाताई वैजिनाथ काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शहीद वीर जवान यांना वंदन करणे कामी यांच्या अर्धांगिनी श्रीमती चंद्रकलाताई उद्धव शिंदे व श्रीमती निर्मलाताई वैजिनाथ काळे यांचा या प्रसंगी मुख्याधिकारी यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित सर्वांनी महिला बचतगट निर्मित दिवे हातात घेवून सर्वाना पंचप्रण शपथ प्रशासकीय अधिकारी सलीम उस्ताद यांनी दिली.
या कार्यक्रमास मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, माजी नगरसेवक मनोज पुदाले, अँड. दत्ता पाटील, अँड.सावन पस्तापुरे, उदगीर नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी, नागरिक तसेच लाल बहादूर शास्त्री, अल अमन, विद्यावर्धनी, जमहूर, संग्राम, दक्कन उर्दू इत्यादी शाळांचे विद्यार्थी व शिक्षक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगरपरिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नोडल अधिकारी महारुद्र गालट यांनी केले.