स्वामी विवेकानंद महाविद्यालय मध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सुरुवात

स्वामी विवेकानंद महाविद्यालय मध्ये 'मेरी माटी मेरा देश' अभियानाची सुरुवात

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे
09 ऑगस्ट 2023 पासून देशभरात राबविण्यात येणाऱ्या आझादी का अमृत महोत्सव “मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आली.

9 ऑगस्ट 2023 पासून केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचने नुसार देशपातळीवर “मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ देण्यात आली. तसेच जागतिक आदिवासी व ऑगस्ट क्रांती दिवस ही साजरा करण्यात आला.

यावेळी रसिका महाविद्यालय देवणी येथील रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार मोरे, स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. धनजय गोंड, परीक्षा नियंत्रक डॉ. शेषनारायण जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदरील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आदिवासी दिवस व ऑगस्ट क्रांती दिवस यांचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रा.रशिद दायमी, प्रा. आकाश कांबळे, प्रा. सोनल सोनफुले, प्रा. संजीवनी भालेराव, प्रा.हनमंत सूर्यवंशी, प्रा. ऋतुजा दिग्रसकर,प्रा. राखी शिंदे, प्रा. असिफ दायमी, प्रा. नावेद मणियार, प्रा. आवेज शेख, प्रा. अनुजा चव्हाण, प्रा. त्वरिता मिटकरी, उषा गायकवाड,अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, अमोल मसुरे, प्रशांत पाटील, सुमित शेलाळे, हर्षद बदणाले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अमर तांदळे तर सूत्रसंचालन प्रा. राहुल पुंडगे व आभार प्रा. आकाश कांबळे यांनी मानले.

About The Author