यशवंत विद्यालयात भाषण स्पर्धेतील गुणवंताचा सत्कार संपन्न

यशवंत विद्यालयात भाषण स्पर्धेतील गुणवंताचा सत्कार संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : लोकशाहीर, साहित्य सम्राट, अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेतील गुणवंताचा सत्कार प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ पुष्पहार व पारितोषिक देऊन करण्यात आला.
यात सर्वप्रथम कु. सालेहा शेख, द्वितीय कु. मानसी राजुरे, तृतीय कु.अनुष्का हाडोळे, कु. गणाचार्य सिद्धी, तर प्रोत्साहनपर पारितोषिक कु. संस्कृती जाधव, मोहित आलापुरे यांना विभागून देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक अशोक पेद्येवाढ, राम तत्तापुरे, अरुण मोरे, राजकुमार पाटील, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन शरद करकनाळे यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मांनले.    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!