कबालनाम्यासाठी नागरीकांचा एल्गार;दिला अंदोलनाचा ईशारा
अहमदपूर ( गोविंद काळे ) शहरातील स.नं.4येथील प्रलंबीत असलेले कबालनामे तातडीने वितरीत करावे अन्यथा नाविलाजाने आम्हाला चक्क सामूहिक आत्मदहन अंदोलन करावे लागेल असा ईशारा युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना सम्राट मित्रमंडळ-लातूर अहमदपूर च्या वतीने दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,येथील गोरगरीब नागरिक गेल्या पन्नास ते साठ वर्षा पासून स.नं.4 येथे वास्तव्यास आहेत.शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदरील अतिक्रमण नियमानूकूल करण्यासाठी आवश्यक ती सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
तहसील कार्यालयाने सदरील जागेचे मूल्यांकन भरण्याच्या नोटीसा दिल्यानंतर येथील नागरिकांनी चलनाद्वारे मूल्यांकन रक्कम शासनास भरली आहे.मात्र सातत्याने पाठपूरावा करून सूध्दा प्रशासनाकडून कबालनामे वाटपाची प्रक्रिया ठप्प ठेवली गेली आहे.
मध्यंतरी सदरील अतिक्रमण कायम करण्यासाठी सातत्याने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी आणी 267 लाभार्थ्यांकडून अंदोलनाचा ईशारा दिला तेंव्हा निवासी उपजिल्हाधिकारी,जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या समवेत लातूर येथे बैठक झाली आणी लवकरच या बाबत कार्यवाही करण्याचे प्रशासनाने लेखी अश्वासन दिले होते.मात्र पूढे कूठलीच कार्यवाही केली नाही.
त्यामुळे आता पुन्हा एकदा युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील सर्व लाभार्थ्यांनी अंदोलनाची भूमिका घेतली असून आता सामूहिक आत्मदहन केल्या शिवाय पर्याय नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
आज लातुर येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घूगे,निवासी उपजिल्हाधिकारी ढगे साहेब,नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे आदी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून मागण्याचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर मोहम्मद पठाण,शेख नूरभाई,नौशाद सय्यद,शेख ईमरान,सय्यद फारूखभाई आदींसह असंख्य नागरीकांचे नांवे आहेत.
लवकरच या संदर्भात तातडीची बैठक घेवून हा विषय मार्गी लावण्याचे अश्वासन या वेळेस प्रशासनाने शिष्टमंडळास दिले.