यशवंत विद्यालयत मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने माझा देश माझी माती सह विविध कार्यक्रम साजरे.

यशवंत विद्यालयत मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने माझा देश माझी माती सह विविध कार्यक्रम साजरे.
अहमदपूर (गोविंद काळे) मराठवाडा मुक्ती दिनाच्या  निमित्ताने माझा देश माझी माती या उपक्रमा अंतर्गत  यशवंत विद्यालयात विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. 
  या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, पर्यवेक्षक मेजर अशोक पेदेवाड, उपक्रमशील शिक्षक राम तत्तापुरे, इंग्रजी विभागाचे प्रमुख अरुण मोरे, विभाग प्रमुख राजकुमार पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, वर्गाची स्वच्छता, परिसर स्वच्छता, वृक्षारोपण घेऊन विजयी स्पर्धकांना प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक राजकुमार पाटील यांनी सूत्रसंचालन शरद करकनाळे यांनी तर आभार राम तत्तापुरे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!