प्रा. डॉ.हरी नरके यांच्या जाण्याने साहित्य चळवळीची हानी – म सा प चे अध्यक्ष सत्यनारायण काळे यांचे प्रतिपादन

प्रा. डॉ.हरी नरके यांच्या जाण्याने साहित्य चळवळीची हानी - म सा प चे अध्यक्ष सत्यनारायण काळे यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) महाराष्ट्रातील सामाजिक सलोखाआणि शांतता राखण्यामध्ये प्रा. डॉ. हरी नरके यांचे योगदान मोठे असल्याचे सांगून समग्र महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी व समता परिषद, भांडारकर ग्रंथालयासाठी  त्यांचे मोलाचे योगदान आहे. म्हणूनच त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील साहित्य चळवळीचे मोठे  नुकसान झाल्याचे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे यांनी केले . 
ते अकरा ऑगस्ट रोजी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात आयोजित प्रा डॉ हरी नरके यांच्या यांच्या अभिवादन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कार्यवाह प्रा.द मा माने, यावेळी मंचावर प्राचार्य निळकंठ पाटील, प्राचार्य दिलीप मुगळे, माजी नगरसेवक शेषराव ससाणे, रामनिवास भुतडा, राजनारायन काळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
 कार्यक्रमाच्या प्रारंभी सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. हरी नरके यांच्या प्रतिमेला  अभिवादन करण्यात आले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांनी तर आभार जिलानी शेख यांनी मांनले. अध्यक्षीय समारोप म सा प चे कार्यवाह प्रा. द मा माने यांच्या भाषणाने झाला.
या सोहळ्याला
मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, शिक्षक, व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मसापच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author