‘इंटरमिजिएट परीक्षेचे फायदे व चित्रकलेतील संधी’ या विषयावर महादेव खळुरे यांची आकाशवाणी वर मुलाखत

'इंटरमिजिएट परीक्षेचे फायदे व चित्रकलेतील संधी' या विषयावर महादेव खळुरे यांची आकाशवाणी वर मुलाखत

अहमदपूर ( गोविंद काळे ) : यशवंत विद्यालय अहमदपूर येथिल उपक्रमशील कला शिक्षक महादेव खळुरे यांची
आँल इंडिया रेडिओचे नांदेड आकाशवाणी केंद्रावर दि.13 आँगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ‘गंमत जंमत’ या कार्यक्रमात “इंटरमिजिएट परीक्षेचे फायदे व चित्रकलेतील विविध संधी” या विषयावरील मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

शालेय स्तरावर कला विषयास अनन्य साधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यामध्ये कला अभिरुची निर्माण करून सौंदर्यदृष्टी विकसित करणे, विविध कलांचा रसास्वाद घेता येणे, सृजनात्मक गुणांचा विकास करणे, कलासंस्कृती तसेच भारतीय कलापरंपरांची जोपासना करणे, पर्यावरण संवर्धना- साठी जाणीव व जागृती निर्माण करणे, राष्ट्राच्या समृद्ध व सर्वसमावेशक अशा कलात्मक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशांचा अभिमान बाळगणे अशा विविध बाबींचा विकास व्हावा या उद्देशाने कला विषय अभ्यासक्रम शालेय स्तरावर ठेवलेले आहे.
इंटरमिजिएट परीक्षेचे महत्व पहाता परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कला क्षेत्रातील अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठीची संधी मिळते.इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण नसेल तर हा अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाही.काही ठिकाणी या परीक्षेचे सवलतीचे वाढिव गुण मिळतात तर काही अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो.मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांनी काय करावे या विषयावर महादेव खळुरे यांनी मुलाखत दिली आहे.
सदरील मुलाखत यशस्वी होण्यासाठी
कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे,प्रसारण अधिकारी
राहुल अत्राम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वरील उपक्रमाबद्दल डायटचे प्राचार्य डाँ.भगिरथी गिरी,माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी,प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे अहमदपूरचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक सांगवीकर,सचिव शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक गजानन शिंदे,उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे,पर्यवेक्षक आशोक पेद्देवाड,सौ पंचगल्ले मँडम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.

About The Author