वाकी नदीवरील घाण स्वच्छ करा अन्यथा आंदोलन करणार
अहमदपुर ( गोविंद काळे ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी यांच्या नेतृत्वाखाली अहमदपुर चाकुर विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख मुर्गेश पिल्ले, युवा सेना जिल्हाप्रमुख लक्ष्मण पेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील वाकी नदीवरील पुलाच्या परीसरात कोंबड्यांची पखे, मांसाचे तुकडे, कत्तल केलेल्या जनावरांची घाण, रक्त,मैल, कचरा टाकल्यामुळे परीसरात दुर्गंधी पसरत आहे. याची तात्काळ दखल घेऊन वाकि नदीचा परिसर स्वच्छ करण्यात यावा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
अहमदपुर अंबेजोगाई राष्ट्रीय महामार्गावर वाकी नदीवरील पुलाच्या परीसरात व हाळणी रोडवरील लेंढीमध्ये कोंबड्यांची पखे, मांसाचे तुकडे, जनावरांची घाण, रक्त, मैल, कचरा पोत्यामध्ये भरुन खाटीक खान्यातील व्यवसाईक रात्रीच्या वेळी टाकत असतात. त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट तत्कालीन नगराध्यक्षा यांनी मागील पाच वर्षापुर्वी केली होती. मागील दोन महिन्यांपासून खाटीक खान्यातील व्यवसाईक भर रस्त्यात आणि साठवण तलावा मध्ये घाण टाकुन नदीपात्र अस्वच्छ करत आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढून परीसरात दुर्गंधी पसरली आहे. सध्या धोंड्याचा महिना आहे, पुढे श्रावण महिना येत आहे. भाविक भक्त अहमदपुर ते परचंडा पाई चालत जाऊन श्रीश्रेत्र रोकडोबाचे दर्शन घेतात, पाई चालत जाणाऱ्या भक्तांना रुमाल नाकाला लावून मांसाचे तुकडे, रक्त,पखे,मैल तुडवत जावे लागत आहे. भाविक भक्तांच्या श्रद्धेचा विचार करावा. अधिकृत, अनधिकृत व्यवसाईकांची तपासणी करण्यात यावी, अनधिकृत लोकांना हटवून अधिकृत व्यवसाईकांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कायम स्वरुपी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी आपल्यावर राहील असे निवेदन नगर परिषद, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालयाला देण्यात आले आहे.
या निवेदनावर उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, लहू बारवाड, युवा सेना उपजिल्हाप्रमुख श्रीनिवास नरहरे,उपशहरप्रमुख शिवकुमार बेद्रे, कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, सुमित गायकवाड, गोविंद उमाटे,अजय सुरनर, संतोष जंगापल्ले, सुरेश जंगापल्ले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.