शिवसेनेचे ( शिंदे गट )शिवदुत मार्गदर्शन शिबिर तसेच पदाधिकारी नियुक्त्या व मेळावा
अहमदपूर ( गोविंद काळे ) शासनाच्या योजनाचा लाभ मिळण्यासाठी शासन आपल्या दारी या योजनेतंर्गत शिवसेना ( शिंदे गट ) यांच्या वतीने शिवदुत मार्गदर्शन शिबीर तसेच पदाधिकारी मेळावा व नियुक्त्या मेळावा शासकीय विश्राम ग्रह येथे घेण्यात आला
याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुका व शहर शिवसेनेच्या ( शिंदे गट ) यांच्या वतीने शासकीय विश्राम ग्रह येथे शासनाच्या योजनाचा लाभ मिळण्यासाठी शासन आपल्या दारी या योजनेतंर्गत शिवदुत मार्गदर्शन शिबीर तसेच पदाधिकारी मेळावा व नियुक्त्या मेळावा शासकीय विश्राम ग्रह येथे घेण्यात आला
या कार्यक्रमास लातुर जिल्हा निरीक्षक तथा सातारा संपर्कप्रमुख शरदजी कणसे लातुर संपर्क प्रमुख क्षीरसागर ,जिल्हा प्रमुख गोपाळभाऊ माने,मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष प्रभारी विष्णूजी बेडदे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले यावेळी
लातूर जिल्हा निरीक्षक कणसे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 24 तासातून अठरा अठरा तास काम करत आहेत, त्यांनी जे आज पर्यंत केलेले काम आहे ते काम जनते पर्यंत पोहचवण्याचे काम शासन आपल्या दारी या योजनेच्या मार्फत प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा तसेच गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक तयार करावे पक्ष वाढीसाठी सर्व पदाधिकारी यांनी प्रत्येक शिवसैनिक यांनी पक्ष कार्य करावे, पदाधिकारी यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आम्ही वरिष्ठ न्याय देण्याचे काम करु, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे,त्यांनी जनतेचे कार्य तनमनानी केले पाहिजे तरच पक्ष वाढतो मोठा होतो व कार्यकर्ते पण मोठे होतात मोठ्या पदावर नियुक्ती होते,मी सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे ते यावेळी म्हणाले
कार्यक्रमाप्रसंगी विविध पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्या पुढील प्रमाणे आहेत विधानसभा प्रमुख -सुनिल देशमुख (अहमदपूर – चाकूर ) विधानसभा समन्वयक – शरद राजाराम शिंदे (अहमदपूर -चाकूर ) विधानसभा संघटक – नरेश रामराव चौथाईवाले (अहमदपूर -चाकूर ) शहर संघटक – अविनाश अंकुश तिडोळे (अहमदपूर शहर)
महिला शहर प्रमुख – पुजाताई राजु जाधव (अहमदपूर शहर) तालुका उप प्रमुख- अमित कुमार कांबळे (किनगाव रोकडा सा.जि.प.सर्कल)
तालुका उप प्रमुख -विभाग प्रमुख किनगाव- जुनेद शेख (किनगाव) तालुका उप प्रमुख- पवन डुरे (खंडाळी-आंधोरी सर्कल).तालुका उपप्रमुख- शिवशंकर आडाव (हाडोळती) – शिरूर ता. जि. प. सर्कल उप विभाग प्रमुख – रमेश दहिफळे किनगाव पं.स.किनगाव आदी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली .
याप्रसंगी विविध संघटना व असोशिएशन सदस्यासोबत चर्चा करून समस्या समजून घेऊन त्यावर लवकरात लवकर अडचणी सोडवण्यासाठी तात्काळ सांगण्यात आले,
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उप जिल्हाप्रमुख गणेश पांचाळ,तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये ,शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले ,महिला तालुका प्रमुख सुवर्णाताई रोकडे,युवासेना तालुका प्रमुख संगम पाटील, प्रवीण डांगे, लक्ष्मण गुट्टे मा.विभाग प्रमुख तथा दगडवाडी उपसरपंच, उप शहर प्रमुख राजु जाधव आदींनी प्रयत्न केले.
यावेळी लक्कीसिंग बावरी, रोहित जाधव,शुभम कोटलवार, रामेश्वर गायकवाड,ऋषभ पाटील, योगेश स्वामी,अनिल चव्हाण, कपिल नाकसाखरे,लादेन पटवेकर,रोहन जाधव,वैभव चिंचोलकर,अक्षय कदम,किरण पवार, सुरज पाटील ,नागेश वरवटे,अक्षय वडीले,हेमंत शिंदे,अक्षय कदम,जमीर शेख,ताईम शेख,ओम लिंगणवाड,शिवा बोगेवार,सोहेल शेख,कैलास जाधव,अभिषेकबनसोडे,अमोल कोतवाड,निखिलकेंद्रे,ओकार,सोनवणे,बालाजी कांबळे,अमित पाटील,आदिल शेख,लखन इबीतदार,अरबाज कुरेशी,अजीम शेख,अमित लुंगारे,ओम पाटील,सिद्दीक शेख,आदी शिवसैनिक पदाधिकारी तसेच निता जाधव, रेणुका जाधव, पद्मावती जाधव, रेखा जाधव, दीपा जाधव, महादेवी जाधव, गवळबाई पवार, श्रीदेवी जाधव, आदी
महिलांची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सुत्र संचलन सुनिल देशमुख यांनी केले तर आभार तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये यांनी मानले