पोलीस फ्लॅश न्यूज बातमीचा इफेक्ट – कासार सिरसी येथील मुख्य रस्ताच्या कामाला सुरुवात
कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसी शेहरातील निलंगा उमरगा या मुख्य रस्त्याच्या मजबुतीकरण व रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात.
या भागाचे विकास पुरुष संबोधले जाणारे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या विशेष निधीतून मागील वर्षी मागणी केलेल्या रस्त्याला तब्बल दहा कोटी रुपये निधी मंजूर करून कामाला सुरुवात करण्यात आले.
मागील वर्षी 24 ऑगस्ट 2022 रोजी कासार सिरसी येथील हनुमान मंदिर ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण व डीवाईडर करण्याची मागणी असल्याची बातमी पोलीस फ्लॅश न्यूज या वृत्तपत्रात छापून आली होती.
तब्बल एक वर्षांनी या रस्त्याच्या कामाला सुरुवात येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत
कासार सिरसी शहर हे आता स्वतःचा रूप बदलत चालल्याचा दिसून येत आहे या भागात अनेक विकास कामे सुरू आहेत त्यामध्ये या कामाचा भर पडला आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या विशेष निधीतून या रस्त्यासाठी एकूण दहा कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत हा रस्ता हनुमान मंदिर ते ग्रामीण रुग्णालय एवढेच नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिराढोण मोड ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत असे दोन किलोमीटर चा रस्ता करण्याचा उद्घाटन आमदार साहेबांच्या आदेशाने येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेच्या हस्ते करण्यात आले.
या शहरातील वाढती रहदारी तसेच या रस्त्यावर होत असलेले अपघात टाळता यावा यासाठी पोलीस फ्लॅश न्यूज ने मागील वर्षी प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या लक्षात बातमीच्या स्वरूपात आणून दिलं होतं त्याचा आज आमच्या टीमसह येथील नागरिक समाधान करत आमदार साहेबांचे आभार मानत आहेत.
या उद्घाटन प्रसंगी परिसरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर वाकडे, धनराज होळकुंदे जिलानी बागवान नितीन पाटील गोरख होळकुंदे विठ्ठल गुप्ता विवेक कोकणे हैदर राजू डोंगापुरे मुत्रे बाबु लामजाने नाना धुमाळ बालाजी बिराजदार प्रशांत गुंडरे जाधव व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.