“देशभक्ती प्रत्येकाच्या मनात जागृत रहावी “- पंडित सुकनिकर

"देशभक्ती प्रत्येकाच्या मनात जागृत रहावी "- पंडित सुकनिकर

उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये “आजादी का अमृत महोत्सव” समारोप वर्षानिमित्त दिनांक 13 ऑगस्ट 2023रोजी शासनाच्या आदेशाप्रमाणे ध्वजारोहणाचा कार्यक्रम श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे शालेय समिती सदस्य पंडितराव सुकनिकर यांच्या शुभहस्ते शाळेत संपन्न झाला. ध्वजारोहणासाठी एन.सी.सी. ऑफिसर सोनाळे बालाजी यांनी प्रमुख अतिथीस पाचारण केले.
आजादी का अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिन निमित्ताने भालेराव भारत, बोडके अमन, हर्ष बिरादार या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषेत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.
ख़ुशी कमलापुरे, वाघमारे प्रेरणा, सोनाक्षी कांडेकर, कोरे वैदवी इत्यादी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.
प्रमुख अतिथी पंडितराव सुकनिकर, डॉ. प्रीती माने यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक आनंद चोबळे , प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण प्रभारी पर्वेक्षक राहुल लिमये, प्रा. सपाटे ज्ञानेश्वर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
मनोगतामध्ये पंडितराव सुकनिकर यांनी आजादी का अमृत महोत्सव यामागील शासनाची भूमिका, देशवासीयांची देशाप्रती देशभक्तीची भावना सतत जागृत रहावी, प्रत्येक नागरिकांच्या मनात देशाबद्दल निष्ठा, स्वाभिमान, देशाचा विकास व समृद्धी यात एक भारतवासी म्हणून प्रत्येक नागरिकांचे मूलभूत कर्तव्य याची जाण सतत मनात राहावी यासंबंधी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सलाउद्दीन शेख, सुनील पुलागोर, तिवारी सचिन, एतनबोने शिलन, नादरगे राहूल, बोळेगावे दिनेश, स्वामी बस्वराज यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत सूर्यवंशी यांनी केले तर आभार व्यक्त करण्याचे कार्य प्रा. सपाटे ज्ञानेश्वर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला

About The Author