सैनिकी विद्यालयात मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत वृक्षारोपण संपन्न

सैनिकी विद्यालयात मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत वृक्षारोपण संपन्न

उदगीर : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत वृक्षारोपण संपन्न झाले.

विद्यालयाचे प्राचार्य व पर्यवेक्षक यांच्या शुभहस्ते सैनिकी विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

प्राचार्य वसंत कुलकर्णी यांनी यावेळी वृक्षाचे महत्त्व सांगताना म्हटले, वृक्षारोपण करणे ही आजची गरज आहे. वृक्षाचे लागवड व संगोपन करणे आवश्यक आहे. वृक्षामुळे आपल्याला शुद्ध हवा, फळे, सावली,लाकुड मिळते.

सैनिकी विद्यालयातील वृक्ष पाहून महाराष्ट्र सरकारने वनश्री पुरस्कार प्रदान केला आहे.

वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मैनोद्दीन सय्यद, संतोष चामले, विनायक करेवाड, बालाजी मुस्कावाड, विलास शिंदे, नागेश पंगू, उमाकांत नादरगे, उज्वला वडले, सीमा मेहत्रे, मारोती मारकवाड, शिवाण्णा गंदगे यांनी परिश्रम घेतले.

यावेळी उपस्थित सर्वच मान्यवर व विद्यार्थी यांचे आभार नागेश पंगू यांनी मानले.

यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author