“डोळे येणे” घाबरू नका,दक्षता घ्या– डॉ. ज्योतीताई सोमवंशी

"डोळे येणे" घाबरू नका,दक्षता घ्या-- डॉ. ज्योतीताई सोमवंशी

उदगीर (एल.पी.उगीले) : सध्या संसर्गजन्य आजार वाढू लागले आहेत. त्यात डोळ्याला त्रास देणारा “डोळे येणे” म्हणून ओळखला जाणारा विषाणूजन्य आजार पसरू लागला आहे खास करून पावसाळ्यामध्ये हा आजार पसरतो डोळ्यांना खाज येणे चिकटपणा सूज येणे डोळे लालसर होणे डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे यासारखी लक्षणे दिसायला लागतात हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संपर्कात आल्यास सहज होऊ शकतो त्यामुळे आजारी व्यक्तींना विलगीकरणात ठेवणे चांगले अशा व्यक्तींनी पूर्ण बरे झाल्याशिवाय इतरांच्या संपर्कात येऊ नये स्वतः सोबतच इतरांची काळजी घ्या असे आवाहन दीपज्योती नेत्र रुग्णालयाच्या प्रख्यात नेत्रातज्ञ ज्योतीताई सोमवंशी यांनी केले आहे. डोळ्यांचा आजार आल्यानंतर डोळे जरी गदगद करत असले तरी डोळ्याला सतत स्पर्श करू नये आणि यदाकदाचित आपण स्पर्श केला असेल तर इतर व्यक्तीशी जवळीत आल्यास त्याला हस्तांदोलन करू नये इतर व्यक्तींचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये शक्यतो गॉगल अथवा चष्मा वापरावा खूप त्यांना शिंकताना रूमलाचा वापर करावा सभोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा डोळ्यांना सतत स्वच्छ पाण्याने धुवावे. डोळा हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असल्यामुळे त्याची निगा राखली पाहिजे जसा तो महत्त्वाचा अवयव आहे तसा असतो नाजूक असल्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे आजारी व्यक्तींनी आपल्या नेत्र तज्ञांशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध गोळ्यांचा वापर करावा ग्रामीण भागातील जनतेने लगेच आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन योग्य ती माहिती घ्यावी असेही आवाहन नेतृत्व ज्योतीताई सोमवंशी यांनी केले आहे.

About The Author