गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देताना आत्मिक समाधान – डॉ.शरद तेलगाने

गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देताना आत्मिक समाधान - डॉ.शरद तेलगाने

उदगीर (एल.पी.उगीले) : समाजामधील अनेक गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे. ही जाणीव जपून समाजातील दानशूर लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिल्याने आत्मिक समाधान मिळते. आपण या समाजाचे काही देणे लागतो, याची जाण निर्माण होते. असे विचार सामाजिक कार्यकर्ते तथा उदगीर येथील सुप्रसिद्ध ओम हॉस्पिटल व मॅटर्निटी होम चे संचालक डॉ. शरद कुमार तेलगाने यांनी व्यक्त केले.

उदगीर येथे शैक्षणिक क्षेत्रात विकास व्हावा. गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देता यावे. अशा उदात्त हेतूने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत होते, आणि ज्यांनी आयुष्यात सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी वेळ दिला ते प्रा. नागनाथ निडवदे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा परिस्थितीवर मात करून दीनदयाल यांची शिकवण आणि आदर्श नव्या पिढीसमोर राहावी, म्हणून दीनदयाल विद्यालयाची सुरुवात केली. संघर्ष करत करत आज या विद्यालयाची प्रगतीकडे वाटचाल चालू आहे. ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. प्रा. नागनाथ निडवदे यांना या भागातील लोक आण्णा या नावाने ओळखत होते. त्या अण्णा यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हे विद्यालय आणखी विकसित होणे गरजेचे आहे. या विद्यालयातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना जे जे म्हणून सहकार्य करता येईल, ते ते करण्याचे अभिवचन देखील याप्रसंगी प्रसिद्ध डॉक्टर शरदकुमार तेलगाणे यांनी दिले. ते दीनदयाल विद्यालयातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी डॉ. प्रवीण देशमुख,सौ. सीमा तेलगाने तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉक्टर तेलगाणे यांनी स्पष्ट केले की, प्रा. नागनाथ निडवदे हे उदगीर शहरातील नामांकित असलेल्या लालबहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये कार्यरत होते. तशाच पद्धतीचे विद्यालय उभा करण्याचे त्यांचे स्वप्न दीनदयाल विद्यालयाने पूर्ण करावे. निडवदे अकाली गेले हे दुःख विसरून सर्वांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहनही या प्रसंगी डॉक्टर शरदकुमार तेलगणे यांनी केले.

About The Author