संत ज्ञानेश्वर विद्यालयात सदभावना दिवस उत्साहात साजरा.

संत ज्ञानेश्वर विद्यालयात सदभावना दिवस उत्साहात साजरा.
अहमदपूर ( गोविंद काळे) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस सदभावना दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
 या समयी प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार   अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशाताई रोडगे यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून अक्षय ऊर्जा, डिजिटल भारत यामध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगून त्यानी सर्व विद्यार्थ्यांना सदभावना शपथ दिली.
यावेळी  पर्यवेक्षक नंदकुमार मद्देवाड, सतीश साबणे ,मंगेश शिवनखेडकर, संजीवनी गुरमे, मीनाक्षी तोवर, संगीता आबंदे, अर्चना जांभळदरे, ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. व्ही मद्देवाड यांनी तर आभार सतीश साबणे यांनी मांनले.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!