अहमदपूर व चाकुर तालुक्यातील खरीप पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांकडे भाजपाची मागणी.

अहमदपूर व चाकुर तालुक्यातील खरीप पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांकडे भाजपाची मागणी.

अहमदपूर ( गोविंद काळे ) : अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या संकटात सापडल्याने खरीप हंगामातील पिकाचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील व माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूरचे तहसीलदार यांच्या फार्मात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या एक महिन्या पासून पाऊस पडला नसल्याने चालू खरीप हंगामातील पिके वाळल्याने दुष्काळ सदग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आसल्याने सरसकट तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच गत वर्षीच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती प्रोत्साहन पर योजने अंतर्गत पन्नास हजार रुपयांचा लाभ अध्याप अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. तोही प्रोत्साहन पर शेतकऱ्यांना पन्नास हजाराचा लाभ देण्यात यावा. गतवर्षीच्या खरीप हंगामातील उत्पादनावरील आधारित पिक विमा अद्याप शेतकऱ्यांना दिला नाही. तोही सरसकट पिक विमा तात्काळ देण्यात यावा अशा काही अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भातील निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी लातूर यांना तहसीलदार अहमदपूर यांच्या फार्मत निवेदन पाठवण्यात आले आहे.
सदरील निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस त्रंबक आबा गुट्टे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, श्रीकांत भुतडा,राजकुमार खंदाडे, अमित रेड्डी, रामभाऊ बेल्लाळे,नाथराव केंद्रे,बाळासाहेब मुंडे, दत्ता सुरनर, निखिल कासनाळे,बालाजी मुंडे, सुरेश जाधव, गणेश मुंडे,बालाजी बोबडे,रामानंद मुंडे,केरबा कांबळे, सोमनाथ पुणे,संग्राम नरवटे,बबनराव नवटक्के,भास्कर केंद्रे, अन्वरखा पठाण, शरद मुंडे, नामदेव आरदवाड,नामदेव फाजगे,राम देवकते,राजकुमार येणगे,राजकुमार नरवटे,नवनाथ जाधव, अंकुश सुर्यवंशी, परमेश्वर भोसले, गजानन गुंडीले,विष्णू पौळ, सोहेल शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author