यशवंत विद्यालयात सदभावना दिवस उत्साहात साजरा

यशवंत विद्यालयात सदभावना दिवस उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) येथील यशवंत विद्यालयात स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस सदभावना दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
 या समयी प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार प्राचार्य गजानन शिंदे यांनी अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
यावेळी सहशिक्षक राम तत्तापूरे यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून डिजिटल युगाची निर्मिती करण्यामध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगून त्यानी सर्व विद्यार्थ्यांना सदभावना शपथ दिली.
यावेळी उपप्राचार्य एम यू सय्यद, पर्यवेक्षक अशोक पेद्येवाड, अरुण मोरे, शिवाजी सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, प्रतिभा सोलापूरे, सचिन खानापुरे, संतोष पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर व्ही पाटील यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मांनले.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!