शासकीय दूध योजना प्रकल्प चालू करण्या करिता मुख्यमंत्री यांना शिफारस व पाठपुरावा करून डेरी चालू करणे असे निवेदन माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना निवेदन
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील शासकीय दूध योजनेअंतर्गत दररोज एक लाख लिटर क्षमतेचे अद्यावत प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावे. हा प्रकल्प एकेकाळी महाराष्ट्रातील सर्वात मोठा दूध भुकटी व दूध संकलन केंद्र होते. एकेकाळचे वैभव आज शेवटची घटिका मोजत आहे. इसवी सन 1978 पासून शासकीय भुकटी प्रकल्प चालू होते. 19 जानेवारी 1979 पासून जून 2002 पर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे चालू होता, त्यानुसार हा प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षपणा मुळे बंद पडला. याचे पुनर्जीवन डिसेंबर 2014 ला करण्यात आले.2014 पासून ते ऑगस्ट 2015 पर्यंत दूध भुकटी प्रकल्प सुरू होता. मात्र ऑगस्ट 2015 नंतर बॉयलर मध्ये अडचणी निर्माण झाल्याकारणाने बंद झाला.तो आजतागायत बंद आहे. या प्रकल्पामध्ये 400 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत होते. या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात श्वेतक्रांती घडून येईल याची दक्षता तज्ञांच्या मार्गदर्शनाने होईल. व शेतकरी सुजलाम, सुफलाम होण्यासाठी मदत होईल. या संदर्भात आ.बच्चुभाऊ कडू यांनी जातीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांची व संबंधित मंत्रालयाशी संपर्क साधून या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावीत म्हणून निवेदन देण्यात आले.यावेळी प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे व तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, उदगीर शहर अध्यक्ष महादेव मोतीपवळे,जिल्हा प्रवक्ते बंडेपा पडसलगे,चाकूर अध्यक्ष वर्धमान कांबळे,सरपंच सुनिल कांबळे, अहमदपूर अध्यक्ष संभाजी केंद्रे यांच्या वतीने निवेदन दिले.