मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी शहरातील डासांचा समुळ नायनाट करण्याची केली उपाय योजना

मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी शहरातील डासांचा समुळ नायनाट करण्याची केली उपाय योजना

नवीन आधुनिक पद्धतीच्या मागवल्या ३० फॉगिंग मशीन नागरिकात समाधान

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : परळी शहरातील नागरी वस्तीत दिवसेंदिवस डासांचा वाढता प्रभाव पाहता परळी नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी शहरातील डासांचा समूळ नायनाट करण्याची प्रभावी उपाययोजना अमलात आणली असून आधुनिक पद्धतीच्या नवीन ३० मशीन आजपासून शहरातील डास निर्मूलनासाठी प्रत्यक्षात कार्यान्वीत केल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने शहरातील व्यापार पेठे बरोबरच नागरी वस्तीत पाणी असल्यामुळे आमचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत अलीकडच्या काळात नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या होत्या. नागरिकांना डासांच्या प्रादुर्भावाचा दिवसेंदिवस वाढणारा त्रास पाहता परळी नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी शहरातील डासांचा कायमचा समुळ नायनाट करण्याचा निर्णय घेतला नव्हे प्रत्यक्षात अमल बजावणी करत परळी शहरासाठी आधुनिक पद्धतीच्या ३० फॉगिंग मशीन आज पासून फवारणी करण्यासाठी स्वतः मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे, नगर अभियंता रामन्ना बेंडले, स्वच्छता निरीक्षक शंकर साळवे, नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी, सामाजिक कार्यकर्ते मजहस इनामदार आदींच्या उपस्थितीत कार्यान्वीत करीत प्रत्यक्षात फवारणीस प्रारंभ केला आहे. शहरातील डास निर्मूलन करण्यासाठी ठोस पावले उचलल्या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांचे आभार व्यक्त करीत समाधान व्यक्त केले आहे.

About The Author