शिरूर अनंतपाळ भाजपा तालुकाध्यक्षपदी मंगेश पाटील
शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी) : तालुका भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी माजी सरपंच मंगेश पाटील येरोळकर यांची फेरनिवड करण्यात आली असून मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या निवडीची घोषणा करून त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, ज्येष्ठ नेते अॅड. संभाजीराव पाटील, प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे, भाजपा नेते संजय दोरवे, दगडूजी साळुंके, माजी सभापती गोविंदराव चिलकुरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, नगराध्यक्ष सौ. मायावती धुमाळे, धोंडीराम सांगवे, जयश्रीताई पाटील, प्रकाश कोरे, आप्पाराव नाटकरे उपस्थित होते.
तालुक्यातील येरोळ येथील मंगेश पाटील यांनी तालुकाध्यक्ष म्हणून भाजपा संघटनासह पक्षवाढीसाठी सतत काम केले आहे. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे कट्टर सर्मथक समजले जाणारे व मंगेश पाटील यांनी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांसह पक्षांतर्गंत अनेक महत्वाच्या पदावर त्यांनी उत्कृष्टपणे काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेवून आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सलग दुसऱ्यांदा भाजपा तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. तालुक्यात मंगेश पाटील हे उत्कृष्ट क्रिकेट पट्टू म्हणूनही परिचित आहेत. उत्कृष्ट संघटन कौशल्य व सोबत तरुणांची मोठी फळी व सर्व घटकांना सोबत घेवून काम करण्याची पद्धत यामुळे त्यांच्या तालुकाध्यक्षपदी निवडीमुळे पक्षाला फायदा होणार आहे. नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत मिळालेल्या संधीचा दिली. उपयोग सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी केला जाईल. माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी काम करून प्रत्येक बुथ व शक्ती केंद्र प्रमुखांशी प्रत्येक कार्यकर्ता जोडून तालुक्यात पक्ष संघटन वाढविणार असल्याची ग्वाही मंगेश पाटील यांनी.