खासदार ओमराजे निंबाळकर यांची नाथसंस्थानांस सदिच्छा भेट
औसा (प्रतिनिधी) : येथील प्राचीन पावन परंपरेच्या सद्गुरू श्री विरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानच्या नाथपीठास श्रावण मास अनुष्ठान पर्वात सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सदिच्छाभेट दिली. आणि पिठाधिपती सदगुरू श्री गुरुबाबा महाराज औसेकर व सदगुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे दर्शन घेतले. यावेळी आदरणीय खा. ओमराजे यांच्याशी बातचीत करतांना परंपरेच्या या अनुष्ठान काळात आपण सद्गुरुंच्या दर्शनासाठी आलात त्याबद्दल समाधान व्यक्त करून,औसा संवस्थांच्या वार्षिक माघ पायी वारी पालखी दिंडी मार्गावरून वीस पंचेवीस हजार वारकरी प्रतिवर्षी औसा येथुन पंढरपूरला पालखीचे सोबत चालत जातात हा मार्ग पालखी मार्ग व्हावा,कारण माघवारीत मराठवाड्यातील सर्वात मोठी अशी ही दिंडी पालखी आहे या महत्वाच्या विषयात लक्ष वेधले,व सविस्तरपणे चर्चा केली.यावेळी खासदार साहेबांनी हा माघ वारीचा पालखी मार्ग प्राधान्याने पुर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी खासदार ओमराजे दादा निंबाळकर व महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपाध्यक्ष तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांचा संस्थांनच्या वतीने श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करून आशिर्वाद दिले, यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ.जयाताई उटगे,युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, ॲड मझर शेख शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते, व नाथ संवस्थांचा शिष्य समुदाय उपस्थित होता.