जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशिल सहशिक्षक डॉ.मारुती कदम यांना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड ची पी एच डी पदवी प्रधान
अहमदपूर (गोविंद काळे) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदगी (बुद्रुक) तालुका अहमदपूर येथील प्राथमिक पदवीधर उपक्रमशील सहशिक्षक डॉ. मारुती रामराव कदम यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने संत तुकारामाच्या गाथेतील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर विद्यापीठाला प्रबंध सादर करून दि.26 रोजी त्यांना विद्यापीठांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे शिक्षण शास्त्र विषयाचे संचालक डॉ. सिंकू कुमार सिंग यांच्या हस्ते आणि अकोला येथील बहिस्थ परीक्षक डॉ. आशा एम धारस्कर यांच्या उपस्थितीत पी एच डी पदवी प्रधान करण्यात आली. त्यांना मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या प्रभारी अधिष्ठाता तथा शासकीय अध्यापक महाविद्यालय, परभणी च्या प्राचार्या डॉ. सुनंदाताई रोडगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
डॉ. मारुती कदम हे जवळगा (बु)चे भूमिपुत्र, ते अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपक्रमशिल असून जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्याचे सुलभक म्हणून अतिशय उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यांच्या या नेत्र दीपक यशाबद्दल डॉ.सतीश सातपुते, तुकाराम पलमटे, भगवान केंद्रे, शिवदास शिंदे, राम तत्तापुरे, बालाजी दर्शने, प्रा. सुधीर दाबके, विलास जाधव, रामदास कदम, शिवदत्त कदम यांच्यासह मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.