सुसाईडल कोटा पॅटर्न….. 24 तासात दोन विद्यार्थी तर वर्षभरात 23 विद्यार्थ्यांची आत्महत्या…
अहमदपूर (गोविंद काळे) : राजस्थान येथील कोटा या शैक्षिणक शहरात एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील उजना येथील आविष्कार कासले चा ही समावेश आहे.यावर्षी आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचा आकडा धक्कादायक आहे .या वर्षी 23 विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा फक्त अभ्यासाच्या अतिरिक्त तानामुळे संपवली आहे.
राजस्थानातील कोटा हे शहर भारताचे शैक्षिणक हब म्हणून ओळखले जाते. संपूर्ण भारतातून विद्यार्थ्यांचा ओढा हा कोटा कडे असतो. त्याला कारणे ही तशीच आहेत. मागील अनेक वर्षापासून जीई मेन्स आणि ॲडव्हान्स मध्ये कोटा येथील विद्यार्थी टॉप आले आहेत.याच कारणामुळे येथे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखाच्या घरात आहे. वार्षिक दहा हजारा कोटी रुपयांची उलाढाल येथे होत असते. विद्यार्थी घडविणारी फॅक्टरी असल्यासारखे येथे काम सतत सुरू असते.
याच ठिकाणी अनेक नावजलेल्या खासगी कोचिंग क्लासचे टोलेजंग कॅम्पस आहेत. हजारो विद्यार्थी येथे भारत भरातून येत असतात. येथे फक्त विद्यार्थ्यांत स्पर्धा नाहीच तर खासगी कोचिंग क्लास मध्ये ही तीव्र स्पर्धा आहेत. यातून मग आमचाच रिझल्ट टॉप लागला हे सिद्ध करण्यासाठी रेस लागली आहे. याचे प्रेशर अनायासे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर येत असते.दर आठवड्याला होणारी परीक्षा ..महिन्याची होणारी परीक्षा त्यात योग्य गुण न घेणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी मग ताण वाढत जातो. यातून येथील विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. मागील काही वर्षातील आकडेवारीतून हे स्पष्ट होत जाते.
2015 साली 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली
2016==साली 16 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली
2017..साली 07 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली
2018…साली 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली
2019…साली 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली
2022..साली 15 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली
या वर्षी आता पर्यंत 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत
याला अपवाद होता तो कोविड काळातला यात 2020 आणि 2021 यावर्षी एकही आत्महत्येची नोंद झालेली नाही.
महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कोटाला शिक्षण घेण्यासाठी जात असतात. अहमदपूर तालुक्यातील उजना येथील अविष्कार संभाजी कासले हाही एक तो सव्वा वर्षापूर्वी कोट्याला शिक्षणासाठी गेला होता. त्याचा मोठा भाऊ कोटा येथेच शिकला होता. आय आय टी ला मोठ्या भावाचा नंबर लागला होता. त्यामुळे आविष्कार कडून ही तश्याच अपेक्षा होत्या. अविष्कारचे आई वडील दोघेही अहमदपूर तालुक्यात शिक्षक म्हणून काम करतात. अहमदपूर तालुक्यातील उजना या गावचे ते मूळ रहिवासी आहेत. अविष्कार ने रविवारी कोटा येथे सहाव्या माळ्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती. अविष्कार च्या मृत्यूची बातमी गावात आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज उशिरा त्याचा मृतदेह कोठ्यावरून उजना या मूळ गावी आणण्यात येणार आहे.
अतिशय चुनचुनित हुशार असलेल्या अविष्कारणे आत्महत्या सारखी टोकाचे पाऊल का उचललं याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. कोटा येथील कोचिंग क्लासेस मध्ये असणारे अभ्यासाचे प्रेशर अविष्कार ला पेलवता आले नाही. यामुळे तो डिप्रेशन मध्ये गेला होता का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. कोटा इथे 24 तासात दोन विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याने नव्याने एज्युकेशन पॅटर्नचा विचार करण्याची वेळ आल्याचं बोललं जातय.