पत्रकार मा.रा. कराड यांचे दु:खद निधन

पत्रकार मा.रा. कराड यांचे दु:खद निधन

अहमदपूर ( प्रतिनिधि) : तालुक्यातील चिखली येयील जेष्ठ पत्रकार मा रा उर्फ माधवराव रानबा कराड यांचे अत्पशा आजाराने मंगळवारी सकाळी नऊच्या दरम्यान त्यांच्या मूळ गावी चिखली येथे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले . त्यांच्यावर अंत्यसंस्कार मुळगावी चिखली येथील सार्वजनिक स्माशनभुमी करण्यात आले. मा रा कराड हे महात्मा फुले विद्यालय अहमदपूर येथून हिंदी विषयाचे शिस्त प्रिय शिक्षक म्हणून सेवा निवृत्त आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय होतं. शोकसभेत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अशोक चाटे ,कवी बालाजी मुंडे, आणि राम तत्तापुरे यांचे मा रा कराड यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी श्रद्धांजलीपर भाषणे झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन व नांतवड असा परिवार असून संजीवनी महाविद्यालय चापोली येथील प्रा राजीव कराड यांचे ते वडिल होत .

About The Author