भविष्यातील सुख उपभोगण्यासाठी विद्यार्थ्यांनी मन लावून काटेकोर पणे अभ्यास करावा – प्रा.डॉ. सुनिता लोहारे यांचे प्रतिपादन

भविष्यातील सुख उपभोगण्यासाठी विद्यार्थ्यांनी मन लावून काटेकोर पणे अभ्यास करावा - प्रा.डॉ. सुनिता लोहारे यांचे प्रतिपादन

अहमदपूर गोविंद काळे) : सद्यस्थितीला देशामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा झालेले आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी व भविष्यातील सुख उपभोगण्यासाठी वेळेचे नियोजन करून अत्यंत काटेकोरपणे अभ्यास करावा असे आग्रही प्रतिपादन सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालिका प्रा. डॉ. सुनीता लोहारे यांनी केले. ते दि. 28 रोजी यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, परवेक्षक अशोक पेद्येवाड, हे होते.

यावेळी पुढे बोलताना प्रा लोहारे म्हणाल्या की, निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकाचा अनमोल वाटा असल्याचे सांगून त्यांचा त्याग आणि श्रम विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे असे जाहीर आवाहन केले. यावेळी प्रा. डॉ. सुनिता लोहारे यांची लातूरच्या सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करून क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन शरद करकनाळे यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author