यशवंत विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

यशवंत विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालया प्रांगणामध्ये हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक गजानन शिंदे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रीडा विभाग प्रमुख संतोष कदम यांचे ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मनोगत पर भाषण झाले. यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या क्रीडापटूंचा प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक अशोक पेंदेवाड, राम तत्तापुरे, आर व्ही पाटील, अनुष्का हा डोळे ,स्मिता कोत्तावार, अंतरा शेटकार, अक्षरा आरदवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक हिंगणे यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षिका प्रभावती मिरजकर यांनी मांनले.

About The Author

error: Content is protected !!