विद्यावर्धिनी विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

विद्यावर्धिनी विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : संपूर्ण भारतात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तरी आज विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. दत्ता गलाले व प्रा.अनिल चवळे व आंतरराष्ट्रीय खेळाडू माही अरदवाड व जानवी जाधव होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील सर व संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका सुषमा पाटील मॅडम यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली याप्रसंगी, विद्यार्थ्यांनी विविध खेळाची माहिती करून घेणे, तसेच विविध खेळात आपला सहभाग नोंदविणे, चांगल्या प्रकारचा आहार घेणे, कोणत्याही खेळात सातत्य ठेवून यश मिळविणे तसेच आपल्या निरोगी व मजबूत शरीरासाठी खेळ खेळणे आवश्यक आहे असे मत प्रा. अनिल चवळे यांनी व्यक्त केले. तसेच विध्यार्थ्यांनी कोणताही खेळ खेळण्यापेक्षा एखादा चांगला खेळ निवडावा व त्यात सातत्य व मेहनत करून यश प्राप्त करावे तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आहारात कडधान्याचा समावेश करावा व जंक फूड टाळावे जेणेकरून आपणास ताकत मिळेल व थकवा येणार नाही तसेच खेळ व खेळाचे महत्व याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. दत्ता भाऊ गलाले यांनी व्यक्त केले तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कवायती व लेझीम चे प्रात्यक्षिके सादर केले याप्रसंगी आंतराष्ट्रीय खेळाडू माही अरदवाड, जानवी जाधव व शाळेतील यशस्वी खेळाडूंचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा पाटील यांनी केले तर अध्यक्षीय समारोप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील सर यांनी केले तर सूत्रसंचालन आकाश जाधव सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक मेहफुज पठाण व इतर शिक्षकांनी प्रयत्न केले.

About The Author