विद्यार्थ्यांनी बनविल्या जवानांसाठी राख्या

विद्यार्थ्यांनी बनविल्या जवानांसाठी राख्या

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना संदेश पत्राने ‘मेरे प्यारे भैया’ असा संदेश असलेल्या राख्या पाठवल्या. सैनिकांसाठी तयार केलेल्या या राख्या महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश, राजस्थान , बंगाल ,सिमला, हिमाचल प्रदेश आदी भागातील सैनिकी कॅम्पला पाठविण्यात आल्या. शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी 1001 राख्या व 501 संदेश, शुभेच्छा पत्र बनवून संकलित केले. देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी या राख्या पाठविण्यात आल्या .या उपक्रमाची संकल्पना संजीवनी गुरमे, अश्विनी घोगरे, शबाना शेख, त्रिगुणा मोरगे, शारदा तिरुके, सविता पाटील, सतीश साबणे, नंदकुमार मद्देवाड यांनी मांडली व राबवून घेतली संस्था अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील सचिव प्राचार्या रेखाताई तरडे मुख्याध्यापिका आशा रोडगे ,मुख्याध्यापक मीनाक्षी तोवर संस्था समन्वयक कुलदीप हाके आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले.

About The Author