सकल धनगर समाज औसा यांच्या वतीने २९ डिसेंबर रोजी भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन
औसा (श्रीमंत होळे) : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी दिनांक २९ डिसेंबर रोजी सकल धनगर समाज औसा तालुका यांच्या वतीने भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांना देत असताना सकल धनगर समाजाचे सर्वश्री उद्धव काळे, आकाश कांबळे, अर्जुन गाडेकर, महादेव कांबळे, विशाल काळे, हनुमंत कांबळे, राजेश सलगर, आनंद काळे यांच्यासह अनेक युवक शिष्टमंडळामध्ये उपस्थित होते.